काँग्रेसमध्ये नेत्यांना किंमत नाही; खंत व्यक्त करत माजी आमदाराने सोडला पक्ष

Dr.Mohinder Rinwa - Congress

काँग्रेसमध्ये (Congress) नेत्यांना किंमत नाही, अशी खंत व्यक्त करत पंजाबमध्ये पक्षाचे माजी आमदार डॉ. मोहिंदर रिनवा (Dr. Mohinder Rinwa) यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकून शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला.

शिरोमणी अकाली दलाचे ( Shiromani Akali Dal) प्रमुख सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी त्यांनी पक्षप्रवेश केला. उल्लेखनीय म्हणजे सध्या पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे रिनवा यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरू आहे. रिनवा यांनी पक्ष सोडण्याच्या दिलेल्या कारणामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे, असे कळते.

“काँग्रेसच्या पक्षव्यवस्थेत माझी कोंडी होत होती, गुदमरल्यासारखे वाटत होते; म्हणून मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसमध्ये कुणीही नेत्याला किंमत देत नाही. खुद्द मुख्यमंत्रीदेखील तुमच्या फोन कॉलला उत्तर देत नाहीत. सत्तेत नसतानादेखील ते पक्षातील कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध नसतात. इथे (शिरोमणी अकाली दल) सुखबीर सिंग बादल कधीही तुमचा फोन कॉल चुकवत नाहीत. ” असे रिनवा म्हणालेत.

रिनवा हे दोन वेळा आमदार म्हणून पंजाबच्या विधानसभेवर निवडून गेले आहेत. एकदा अपक्ष म्हणून तर एकदा काँग्रेसच्या तिकिटावर. २०१७ च्या विधानसभा निवडणुकांमध्येदेखील रिनवा पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते. त्यांना टाळून देविंदर सिंग घुबया यांना तिकीट दिल्यामुळे रिनवा संतप्त झाले होते. त्यांनी त्याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा इशारा दिला होता. मात्र, नंतर त्यांची समजूत काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button