विरोधी पक्षात असतानाही लोकसभेच्या सभापती पदी विराजमान होणारा नेता!

दिनांक २४ नोव्हेंबर १९९७, सोमवार. दुपारच्या जेवणाच्या ब्रेकनंतर लोकसभेची कारवाई सुरु होती. नेहमीप्रमाण लोकसभेत गदारोळ सुरु झाला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचे दोन दिवस असेच वाया गेले तिसऱ्यादिवशी ही स्थिती सारखीच.

लोकसभेच्या सभापतींनी सभागृहाला उद्देशुन बोलायला सुरुवात केली. राजीव गांधींच्या हत्येच्या प्रकरणात जैन कमिशनची रिपोर्ट लिक झाली होती. काँग्रेस पक्षातील सदस्य सरकारमधील डीएमकेच्या मंत्र्यांकडून राजीनामा मागत होते. त्यांनी डिएमकेबद्दल बोलताना त्यांच्या भावनेचा आदर करत असल्याचे सांगितले पण लोकसभेत होणारा हा गदारोळ योग्य नसून अनिश्चीत कालासाठी सभा तहकुब करत असल्याचे सभापती म्हणाले.

हे एकूण संपूर्ण देशाला धक्का बसला. भारताच्या इतिहासात अशी परिस्थीती कधीच ओढावली नव्हती. कुणालाच सभापतीच्या अशा कडक निर्णयाचा कल्पना नव्हती.

सभापती म्हणाले, “मी शालेय शिक्षक राहिलोय अशी परिस्थीत कशी हाताळायची मला चांगली कल्पना आहे.”

ही गोष्ट आहे पुर्णो अंगिता संगमा म्हणजे पी ए संगमा यांची-

पी.ए.संगमा (P.A Sangma) मेघालयाच्या गोरो हिल विभातल्या तुरा गावतील व्यक्तीमत्तव. तुरा मेघायलायतलं अतिमागास क्षेत्र आहे. शालेय जीवनात अनेक किलोमीटर चालत जावं लागायचं. अशात एका इटालियन पाद्री जिओनी बतिस्ता बुशोलिन यांच्या मदतीमुळं संगमा यांना सरकारी विद्यालयात प्रवेश मिळाला. पुढं त्यांनी शिलाँग आणि डिब्रुगडमधून शिक्षण पुर्ण केलं. राज्यशास्त्रातून त्यांनी मास्टर्सची डिग्री मिळवली. चार वर्ष त्यांनी शिक्षकाचं काम केलं.१९६८ ते ७२पर्यंत. यात मन रमलं नाही म्हणून शिक्षकाची नोकरी सोडून परत गोरो हिलला आल्यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत नेतागिरी करायला सुरुवात केली.

त्यावेळी युथ काँग्रेस संजीव गांधीच्या नियंत्रणात होती. इंदिरांचा नेहमी शिलोंग दौरा असायचा. याच दौऱ्यावेळी त्यांची नजर पी.ए संगमा यांच्यावर पडली. मग काय पुढं १९७७च्या लोकसभा निवडणूकीच तुरा मतदारसंघातून त्यांना काँग्रेसनं मैदानात उतरवलं. ही निवडणूक काँग्रेससाठी मानहानीकारक ठरलेली. स्वतः इंदिरा आणि संजय गांधींचा निडवणूकीत पराभव झाला पण संगामांनी बाजी मारली. संगमा पहिल्यांदा लोकसभेत पोहचले. १९८०ला त्यांना लाल बत्ती मिळाली. पण संगमांना रजीव गांधीच्या काळात मेघालय राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या मिळालेल्या जबाबदारीनं त्यांच्या राजकीय कारकिर्दीला वेगळी कलाटणी मिळाली. ते २ वर्ष मुख्यमंत्री राहिले होते. राजीव गांधींनी १९९१ला संगमांना पुन्हा दिल्लीत बोलावून घेतलं. पण राजीव गांधी स्वतः दिल्लीला पोहचू शकले नाहीत. तमिळनाडूच्या श्रीपेरुंबुदूर नावाच्या एका मानवी बॉंम्बच्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला.

काळ बदलला. पी व्ही नरसिंह रावांच युग सुरु झालं. संगमांची गिणती नृसिंहरावांच्या विश्वासपात्र शिलेदारांमध्ये होवू लागली. त्यांना सुचना आणि प्रसारण मंत्रालय मिळालं सरकारची प्रतिमा सुधारण्याच्या जबाबदारीसह. पी ए संगमा ही जबाबदारी निभावू शकले नाहीत. नृसिंहरावांवर झारखंड मुक्ती मोर्चा आणि लक्खूभाई पाठक चिटींग केसमुळं १९९६मध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला.

लोकसभेचे सभापती बनणार पहिले विरोधी खासदार

१९९६ला भाजप सत्तेत आली. सभापती पदाच्या निवडणूकीसाठी कॉंग्रेसनं संगमा यांच नाव पुढं केलं. तर संयुक्त मोर्चाने कॉम्रेड हरिकिशन सिंह सुरजीत यांच्या नावाला समर्थन दर्शवलं. भाजपला विश्वास ठराव पास करायला १७ दिवसांची मुदत होती. याआधी आपल्या सदस्यांची संख्या पुढं येवू नये म्हणून निवडणूकीला सामोरं जाण्याऐवजी कॉंग्रेसच्या संगमांना भाजपनं पाठिंबा जाहिर केला. २४ मे १९९६ला सर्वसम्मतीनं संगमा यांची सभापती पदी निवड झाली. संमगांच्या आधी जेवढे काही सभापती झाले ते सर्व सत्ता पक्षातून होते. संगमांनी ही परंपरा तोडून टाकली.

विदेशी असल्याचा मुद्दा उचलून सोडली काँग्रेस

फक्त एका मतानं अटल बिहारींचं सरकार पडलं. १२ वी लोकसभा भंग झाली. नव्या निवडणूकीची तयारी सुरु झाली. लोकसभा भंग होवून ३ आठवडे झाले. काँग्रेसच्या कार्यसमितीपुढं एक चिठ्ठी आली. तीन दिग्गज सदस्यांनी लिहलेली चिठ्ठी…शरद पवार, पी.ए संगमा आणि तारिख अनवर… सोनिया गांधी विदेशी असल्याचा मुद्दा उपस्थीत करत त्यांनी सोनियांना विरोध करायला सुरुवात केली होती.

प्रधामंत्री होण्याच स्वप्न भंगल्यामुळं शरद पवारांनी अस्वस्थ होवून हा निर्णय घेतल्याच लोक जाणून होते. सोनियांनी यावर कठोर पावलं उचलत. संगमा, पवार, अनवर या अमर- अखबर- अँथमीच्या तिकडीची कॉंग्रेसमधून हकालपट्टी केली. नंतर या तिन्ही नेत्यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

नंतर ९९ची लोकसभा संगमांनी काँग्रेसच्या पंजाविरुद्ध राष्ट्रवादीतून लढवली. संगमा निवडूण आले. पण २००४पर्यंत त्यांचा मोहभंग झाला होता. याचवर्षी त्यांनी ममतांच्या तृणमुल काँग्रेसमध्ये त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन केला. २००६ला ते परत राष्ट्रवादीत आले. २००९ची लोकसभा त्यांच्या मुलीला लढायला लावली. त्या निवडूण आल्या आणि मनमोहन सरकरामध्ये मंत्री ही होत्या.२०१२ ला पुन्हा त्यांनी एनडीएच्या बाजूने राष्ट्रपती पदासाठी प्रणव मुखर्जींना आव्हान दिलं. संगमा पराभूत झाले.

२०१४ला पुन्हा तुरा लोकसभा मतदार संघातून निवडूण आले आणि दोन वर्षानंतर हार्ट अटॅकनं त्यांच निधन झालं. त्यांचा मुलगा कोनराड संगमा त्यांचा वारसा पुढं चालवतोय..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER