वंचित आघाडी विधानसभेच्या तयारीला, आंबेडकरांकडून पहिला उमेदवार जाहीर!

Prakash Ambedkar

औरंगाबाद :- आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार उभे केल्याने सर्वच पक्षात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. याचा सर्वात जास्त फटका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसणार असल्याचे बोलले जात आहे. आणि अशातच प्रकाश आंबेडकर यांनी एक निर्णय घेत आणखी मोठा धक्का दिला आहे.

ही बातमी पण वाचा : पवारांनी रेव्ह पार्टी करणाऱ्या नातवाला मावळ मतदारसंघ ‘चॉकलेट’ म्हणून दिला : आंबेडकर

सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे अजून शांत झालेच नाही तर वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. काल प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचा पहिला उमेदवार जाहीर केला. प्रकाश आंबेडकर यांनी पहिला उमेदवार हा औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून जाहीर केला आहे, वंचित बहुजन आघाडी तर्फे विधानसभेची पहिली उमेदवारी हि भारिप बहुजन महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष अमित भुईगळ यांना जाहीर करण्यात आली आहे. आणि त्याबाबतची माहिती स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

ही बातमी पण वाचा : प्रस्थापित आता विस्थापित होणार आणि वंचित बहुजन सत्तेत येणार! – प्रकाश आंबेडकर