विनयभंग प्रकरणी जिल्हापरिषद विरोधी पक्षनेत्याला न्यायालयीन कोठडी

Vijay Bhoje

कोल्हापूर :- विनयभंगाच्या गुन्हयात संशियत असलेले कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांना सोमवारी सकाळी शाहूपुरी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. पोलिसांनी भोजेंना ताब्यात घेऊन, व्ही.सी. द्वारे न्यायालयासमोर हजर केले. सुनावणीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी विजय भोजे यांच्यावर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील एका महिला अधिकारी यांनी विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. दरम्यान भोजे यांनी त्यांच्या विरोधातील तक्रार ही चुकीची असून यासंबंधी कोर्टात दाद मागू, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, म्हणून माझ्याविरोधात फिर्याद दिल्याचे म्हटले होते. सुमारे २० दिवसापासून भोजे पसार होते. अखेर आज सकाळी विजय भोजे शाहूपुरी पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाले. व्हीसी द्वारे त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली. दरम्यान, न्यायालयाने भोजे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून याप्रकरणी अधिक तपास शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांच्यासह कर्मचारी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER