लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची कल्पना होती तेजाबचे गाणे एक दोन तीन चार

Laxamikant parelal-Madhuri Dixit

तेजाब (Tejab) चित्रपटाने आणि माधुरीच्या एक दो तीन चारने प्रेक्षकांना वेड लावले होते. परंतु या गाण्याच्या निर्मितीची कथा फारच इंटरेस्टिंग आहे. माधुरीने  (Madhuri)चित्रपटात बारमध्ये काम करणाऱ्या मोहिनीची भूमिका साकारली होती. माधुरीसाठी एक आयटम साँग तयार करण्याची कल्पना दिग्दर्शक एन. चंद्रा यांना सुचली. चित्रपटाचे संगीतकार होते लक्ष्मीकांत-प्यारेलाल (Laxmikant Pyarelal) आणि गीतकार होते जावेद अख्तर. एन. चंद्रा यांनी या सगळ्यांना गाण्याची सिचुएशन सांगितली परंतु त्यांना ती सिचुएशन काय ते समजलेच नाही. या गाण्यासाठी दोन मीटिंग झाल्या परंतु दोन्हीही मीटिंगमध्ये काहीही झाले नाही. तिसऱ्या मीटिंगला तर जावेद अख्तर आलेच नाहीत. याच दरम्यान लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी एक गाणे ऐकले.

ते त्यांच्या मनात बसले आणि त्यांनी त्यावर आधारित एक चाल तयार केली. शब्द नसल्याने त्यांनी सुरुवातीला एक, दो, तीन, चार असे शब्द जो़डले. ही चाल त्यांनी जावेद अख्तर यांना पाठवून दिली. त्यानंतर झालेल्या मीटिंगमध्ये जावेद अख्तर गाणे घेऊन आले. मात्र गाण्याच्या सुरुवातीला त्यांनी एक दो तीन चार शब्द तसेच ठेवले आणि पुढील बोल लिहिले. मात्र गाण्याच्या सुरुवातीला आकडे चालणार नाहीत असे एन चंद्रा आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना वाटत होते.

जावेद अख्तर यांनी हे आकडेच या गाण्याला लोकप्रिय बनवतील असा विश्वास त्यांना दिला आणि गाण्यात आकडे ठेवण्यात आले.  नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी या गाण्यासाठी विशेष स्टेप्स तयार केल्या आणि माधुरीला त्यावर नाचवले. हे गाणे आजही लोकप्रिय आहे. हा जावेद अख्तर यांचा विश्वास किती खरा होता ते दाखवून देते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER