शिवसेना आणि माझे काही वावडे नाही, उदधव ठाकरेंची साथ देणार – लक्ष्मण माने

Laxman Mane

सोलापूर :- वंचित बहुजन आघाडी भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) मदत करत असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वातील वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने वंचितमधून बाहेर पडले होते. मात्र, आता त्यांनी शिवसेना (Shivsena) आणि आपले काही वावडे नसल्याचं म्शिहटलं आहे तसेच ते शिवसेनेला मदत करणार असल्याचे बोलले आहे.

लक्ष्मण माने म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे हे आमच्या चळवळीचे नेते आणि माझे गुरु होते. त्यांचा मुलगा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चूक केली. मात्र, नातवंडे सुधारत असतील तर त्यांना मदत करण्याची माझी तयारी आहे.” म्हणजेच आगामी विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा साथ देणार असं म्हणत आहेत.

माने यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) सोलापुरात पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत (Assembly Election) भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला मदत करणार असल्याचे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होऊ नये – प्रकाश आंबेडकर