ढोबळेंची टीका : भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्यालासुद्धा लाज वाटेल; पण धनंजय मुंडेला नाही

Laxman Dhoble criticize Dhananjay Munde

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील (Pandharpur-Mangalvedha by-election) प्रचाराची चर्चा चांगलीच गाजत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली आहे. रेणू शर्मा (Renu Sharma) प्रकरणावरून मुंडेंना चांगलेच धारेवर धरले आहे. सोमवारी भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात सभा झाली. या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

यावेळी लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी रेणू शर्मा प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. “माय बहीण करवली म्हणून आली.” असे धनंजय मुंडे म्हणाले. “वहिनी तुम्ही आलात म्हणजे ताटात सांडले काय आणि वाटीत सांडले काय सारखंच. दोघी बहिणी-बहिणी एकत्र राहावा. मग एकदा वीज कनेक्शन घेतले की मीटर पडणारच. तेव्हा ते म्हणाले, मला अजिबात भीती वाटत नाही. महाराष्ट्रातील माझा लाडका नेता पुरोगामी आहे. असे नवीन विषय पुरोगामित्वाचे स्वीकारले पाहिजे. भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्यालादेखील लाज वाटते. पण धनंजय मुंडेंना लाज वाटली नाही.” अशी टीका लक्ष्मण ढोबळे यांनी केली. “आमची चित्राताई वाघ वाघिणीसारखी हातात पायतण घेऊन उभी होती. नीट समजून घ्या.” असेही ढोबळे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button