
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले; मात्र यानंतर तक्रारदार महिलेवरच ब्लॅकमेल केल्याचे आरोप केले गेले. त्यामुळे या प्रकरणानं एक वेगळं वळण घेतलं आहे. संबंधित महिलेचे वकील रमेश त्रिपाठी (Ramesh Tripathi) यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महिलेवर केले गेलेले आरोप केवळ तिला एकटं पाडण्यासाठी आणि आमची बाजू कमकुवत करण्यासाठी होत आहेत, असंही वकील म्हणाले. यावेळी रेणू शर्मा (Renu Sharma) यांच्या वकिलाने सांगितले की, रेणू शर्मावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत.
मला धमाक्या येत आहेत. अश्लील भाषेचा उपयोग केला जात आहे. रेणू शर्मा यांची प्रतिमा खराब खरण्याचा प्रयत्न होत आहे. मला आणि रेणू शर्मा यांना संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. आमची तक्रार दाखल केली नाही तर कोर्टात जाणार. आम्हाला कोर्टावर विश्वास आहे. उद्या एसीपी ऑफिसला जाऊन तक्रार दाखल करणार आहे. रेणू यांच्यावरील आरोप केवळ मीडियातून आले आहेत. त्याबाबत कुणीही आम्हाला नोटीस दिलेली नाही.
आम्हाला जेव्हा नोटीस येईल तेव्हा बघू. मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देणार आहोत. करुणा आणि रेणू शर्मा या दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. दोन्ही सख्ख्या बहिणी आहेत. याचा अर्थ एकीशी लग्न झाल्याने दुसरीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही. रेणू यांच्यावर बलात्कार झाला आहे. त्याचा व्हिडीओ काढलेला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होऊ नये म्हणून रेणू यांनी केस दाखल केली नव्हती. उद्या आमचा एफआयआर दाखल होणार.
नाही झाला तर कोर्टात जाऊ.मला धमक्या देण्यात येत आहेत. काल सायंकाळी साडेसात वाजल्यापासून धमक्या येणं सुरू झालं आहे. तुम्ही केस सोडा, त्यांच्याविरोधात केस लढू नका, असं म्हणत धमकावलं जात आहे. मला फोनवरून शिव्या घातल्या जात असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला