वकिल युवक बनला वैज्ञानिक…कलामांनी दिलं ‘ड्रोन मॅन ऑफ इंडीया’चं नाव

Maharashtra Today

भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दूल कलाम (A.P.J. Abdul Kalam)यांना जगभरात ‘मिसाईल मॅन’ या नावानं ओळखले जाते. प्रचंड तपश्चर्येनं स्वतःला त्यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं. कलामांसारखा माणूस जर एखाद्याला ‘ड्रोन मॅन’ (‘Drone Man’) अशी पदवी देत असतील तर तो माणूस नक्कीच विद्वान असेल. उत्तर प्रदेशच्या लखनऊतील मिलिंद राज(Milind Raj) यांची ही कहाणी. २०१४ साली कलामांनी मलिंद यांनी बनवलेला ड्रोन पाहिला आणि त्यांनी मलिंद राज यांना ‘ड्रोन मॅन’ अशी उपाधी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून मिलिंद वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन बनवत आहेत. सोबतच अनेक प्रकारच्या रोबोट्सचा विकास त्यांनी केलाय. त्यांनी बनवलेल्या ड्रोन्स आणि रोबोट्सना जगभरात मागणी आहे. वेळोवेळी त्यांनी बनवलेले ड्रोन मानवतेच्या उपयोगी आलेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य नागरिकांचं आयुष्य सोप्प बनवण्यासाठी व्हावा असं त्यांच मत असतं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर योग्य पद्धतीन केल तर तो संपुर्ण मानवतेसाठी वरदान ठरु शकतो असं मलिंद सांगता.

एकदा त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून नालीत पडलेलं कुत्र्याचं पिल्लू बाहेर काढलं होतं. तर कोरोना महामारीशी लढण्यासाठी त्यांनी अनेक ‘सॅनिटाझेशन ड्रोन’ बनवले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक असा रोबोट बनवला जो अपंग कुत्र्याची पुर्ण काळजी घेते.

थर्माकॉलचं विमान उडवण्यापासून सुरुवात

लहानपणापासून मिलिंद यांना खेळण्यासाठी जी कोणती खेळणी मिळायची त्यांना खोलून पहाणं त्यांचा छंद होता. सातवीत असताना त्यांनी थर्माकॉलचं विमान बनवून ते उडवून दाखवलं होतं. त्यांच्या प्रयोगशील वृत्तीच शाळा, महाविद्यालयं आणि घरच्यांना कौतूक होतं. शाळेतील अभ्यासांसोबतच त्यांनी अनेक विज्ञान विषयक अभ्यास केला होता. पुढं त्यांनी ‘मॅनेजमेंट सायन्स अँड लिगल स्टडीज’ या विषयाचा अभ्यास केला.

ड्रोन आणि रोबोट्स बनवण्याचं काम त्यांनी पुढंही सुरु ठेवलं. २०१५ला त्यांनी पदवी घेतली. याच्या एका वर्षाआधी त्यांनी कलामांची भेट घेत त्यांनी बनवलेले ड्रोन दाखवले. कलामांनीच मलिंद राज यांचे ड्रोन लॉंच केले. यावेळीच कलामांनी मिलिंद राज यांना ‘ड्रोन मॅन’ ही पदवी दिली.

संशोधनासाठी करण्यात आलंय सन्मानित

मलिंद राज यांची स्वतःची कंपनी ड्रोन आणि रोबोट्स आता विकसीत करते आहे. ते ही कंपनी चालवत असतानाच लहान मुलांसाठी ‘रोबोटीक्स कल्ब’ चालवतात. त्यांच्याकडे मुलांच्या दोन तुकड्या शिकतात. एका तुकडीत समृद्ध घरातली मुलं ज्यांचे आई वडील फीस भरु शकतात ती आहेत तर दुसऱ्या बाजूला अशी मुलं ज्यांना शिक्षणाची गरज आहे परंतू ते फी भरु शकत नाहीत. एका तुकडीतून येणाऱ्या फीसचे पैसे दुसऱ्या तुकडीच्या शिकणासाठी वापरले जातात.

दररोजच्या अडीअडचणी ड्रोनच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मिलिंद राज प्रयत्नशील आहेत. २०१७ साली त्यांना ‘यंग अचिव्हर’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावीपणे काम करतील अशा ड्रोन्सचा विकास सुरु असल्याचं मिलिंद राज यांनी अनेक मुलाखतीत सांगितलं आहे. भारतात वैज्ञानिक दृष्टीकोनच्या विकासासाठी मिलिंद राज कार्यरत आहेत.

ड्रोन विषयक या गोष्टीही तुम्हाला माहिती असायला हव्यात

साधारणपणे दोन प्रकारचे ड्रोन असतात. पैकी ‘यूएव्ही’ म्हणजे ‘अनमॅन्ड एरियल व्हेइकल’ म्हणजे मानवरहित उडते वाहन असे म्हणता येईल. सर्वांत आधी त्याचा वापर सैनिकी कारवायांसाठी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात ड्रोनची ओळख लढाईसाठीचं प्रभावी उपकरण म्हणूनच झाली होती. अशा वैमानिक विरहीत विमानांचे संशोधन मागच्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे सन १९०० मध्येच सुरू झालं होतं. पहिल्या महायुद्धाच्या काळातही ते सुरू राहिलं. तेव्हापासूनचे हे संशोधन आताचे अत्याधुनिक ड्रोन निर्माण झाल्यानंतरही सुरूच आहे. भारतात ड्रोन्सचा वाढता वापर भारताच्या विकसीत देशाकडे होणाऱ्या वाटचालीचे साक्ष देते.

ड्रोन नाव का पडलं?

उपकरणाला जगभरात ड्रोन या नावानेच ओळखले जाते. पण या नावाला विशेष असा कोणताही अर्थ नसून, ड्रोन उडत असताना येणाऱ्या भुंग्यासारख्या आवाजावरून त्याला हे नाव पडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button