बेनामी मालमत्तेवर आता सरकारची करडी नजर; नवा कायदा करण्याचे मोदींचे संकेत

PM Modi

नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय घेतल्या नंतर काळापैसा आणि भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर सरकारची करडी नजर असून, काळापैसा आणि भ्रष्ठाचारविरोधात लढाई आपण अशीच सुरु ठेवून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लवकरच नवा कडक कायदा करणार असल्याचे संकेत रविवारी वर्षाअखेच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

बेनामी संपत्ती कायदा १९८८ मध्ये करण्यात आला. परंतु, याचे नियम तयार करण्यात आले नाहीत, ना त्याची अधिसूचना काढली. त्यामुळे हा कायदा कुचकामी ठरल्याचे ते म्हणाले. आता तोच कायदा अधिक कठोर तरतुदींनी कडक करून आगामी काळात लागू केला जाईल, अशी घोषणा मोदींनी केली.

यावेळी बोलताना मोदी म्हणालेत, ८ नोव्हेंबरला जेव्हा नोटाबंदीच्या निर्णय घेण्यात आला, मी तेव्हाच सांगितलं होत, काळापैसा आणि भ्रष्ठाचाराची लढाई सोपं नाही. ही लढाई लढताना काही लोक नोटबंदी निर्णयातील उणिवा दाखवत आहेत माझ्यावर टीका करत आहे. पण, सरकार आता थांबणार नाही. ही लढाई जिंकायचीच आहे, असे मोदींनी यावेळी नमूद केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेनं भ्रष्ट्राचाराविरोधातील लढाईत सरकारला साथ द्यावी असं आव्हाहन केलं.