नुकसानग्रस्त कोकणवासियांच्या मदतीसाठी भाजपकडून ‘फिफ्थ पिल्लर’ उपक्रमाची सुरूवात

Devendra Fadnavis - Maharastra Today

मुंबई :- नुकत्याच येऊन गेलेल्या तौत्के चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) कोकणाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणवासियांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. मागच्या वर्षी येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची मदत आद्यपही कोकणातील काही नुकसानग्रस्तांना मिळाली नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या दौऱ्यादरम्या समोर आले. यासाठी कोकणावासीयांना पुर्ण मदत मिळण्यासाठी भाजपकडून (BJP) ‘फिफ्थ पिल्लर’ उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. तौत्के चक्रीवादाळात ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसानीचे पंचनामे करुन मदत मिळाली आहे की नाही या माहितीच्या आधारे नुकसानग्रस्ताला मदत करण्यात येणार आहे.

निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची योग्य मदत कोकणवासियांना (Konkan) प्राप्त व्हावी, याहेतूने भाजपातर्फे ‘फिफ्थ पिल्लर’ या उपक्रमाचा प्रारंभ आज करण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते. या चक्रीवादळात ज्यांचे नुकसान झाले, पण, त्यांना भरपाई मिळालेली नाही, नुकसान झाले पण, पंचनामाच झाला नाही किंवा पंचमाना झाला पण, तो योग्यप्रकारे झालेला नाही, याची माहिती त्यांना या फेसबुक आणि युट्युब माध्यमावर मांडता येईल. यातून संकलित होणार्‍या माहितीतून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. असे ट्विट यांनी केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button