अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्ट अ‍ॅप मराठीत सुरू करा अन्यथा त्यांची दिवाळी…; मनसेचा इशारा

Raj Thackeray - Flipkart - Amazon

मुंबई :- राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आता आपला मोर्चा अ‍ॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवला आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं अ‍ॅप मराठी भाषेत (Marathi Language) सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशा मनसेने दिला आहे.

कोरोना (Corona) काळात ऑनलाईन खरेदिशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आता ऑनलाईन शॉपिंग हे नुसता ट्रेंड न राहता आता अनेकांची ही गरज बनली आहे. त्यातच नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर फ्लिपकार्ट आणि अमेझॉनसारख्या शॉपिंग साईट्सने ऑनलाईन खरेदीवर मोठ्या ऑफर सुरू केल्या आहेत. इंग्रजी, हिंदी आणि दक्षिणेतील काही भाषांसह हे अ‍ॅप भारतात काम करतात. पण, या अ‍ॅपसाठी मराठी भाषेचा वापर होत नसल्याने मनसेनं आक्रम पवित्रा घेतला आहे.

”अमेझॉन व फ्लिकार्ट ह्या बॅंगलळुरू स्थित कंपन्यांची दक्षिणी भाषांना प्राधान्य देत महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलले आहे. तरी, आज @Flipkart @amazonIN ह्या कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन @mnsadhikrut दणका दिला.”, असं ट्विट अखिल चित्रे यांनी केलंय.

जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये राज साहेब ठाकरे आहेत, तोपर्यंत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या कुठल्याही कंपनीला सोडणार नाही, असे मनसेचे संयुक्त सरचिटणीस सचिन यशवंत गोळे यांनी म्हटले आहे. गोळे यांनी अमेझॉनच्या कार्यालयात जाऊन कंपनीतील अधिकाऱ्यांना माफी मागण्यासही भाग पाडले. मराठी भाषेचा वापर न केल्यामुळे अगोदर माफी मागा अन्यथा मनसेस्टाईल दाखवू असा इशाराच मनसेनं दिला होता. त्यानंतर, या कंपनीतील अधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे. तसेच, यापुढे ॲमेझॉन (AMAZON) कंपनीला महाराष्ट्रामध्ये काम करायचे असेल तर मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे अशी ताकीद सुध्दा दिली.

कंपनीनेही लवकरच वरिष्ठांशी बोलून मराठी भाषेतही कंपनीकडून व्यवहार करण्यास सुरूवात होईल, असे आश्वासन दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER