ट्रम्प मोटेराकडे निघाले

Latest News news of Donald Trump Ahmedabad visit

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलॅनिया, मुलगी इवांका आणि जावईसुद्धा  आले आहेत. विमानतळावर गुजराती नृत्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. विमानतळावरून ट्रम्प यांचा ताफा साबरमती आश्रमात गेला.

विमानतळ ते साबरमती आश्रम दरम्यान ट्रम्प यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर गर्दी झाली होती. ३५ डिग्री तापमानातही अनेक तास लोक उभे होते. लोकांनी भारत – अमेरिकेच्या मैत्रीचे संदेश लिहिलेले फलक हातात घेतले होते. साबरमती आश्रमात ट्रम्प यांनी महात्मा गांधी यांच्या संग्रहित वस्तू, चरखा पाहिला. चरख्यावर सूत कसे काढतात याची माहिती घेतली.

या भेटीत मेलॅनिया आणि इवांका ह्या ट्रम्प यांच्यासोबत होत्या. साबरमती आश्रमानंतर ट्रम्प यांचा ताफा मोटेरा स्टेडियम येथे पोहचला आहे. ट्रम्प यांच्या हस्ते या जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियमचे उद्घाटन होणार आहे. या स्टेडियममध्ये १ लाख १० हजार प्रेक्षक बसू शकतात. येथे ट्रम्प यांच्या स्वागतात ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम सादर होणार आहे. स्टेडियम खचाखच भरले आहे.

साबरमती आश्रमानंतर ट्रम्प यांचा ताफा मोटेरा स्टेडियम येथे पोहचला आहे. ट्रम्प यांच्या हस्ते या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे उदघाटन होणार आहे. या स्टेडियममध्ये १ लाख १० हजार प्रेक्षक बसू शकतात. येथे ट्रम्प यांच्या स्वागतात ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम सादर होणार आहे.स्टेडियम खचाखच भरले आहे.