‘पंचमदा’च्या पुण्यतिथीनिमित्त लता मंगेशकर यांनी केला खुलासा; ट्विटमध्ये सांगितले हे सत्य

latamangeskar & RD Burman

राहुल देव बर्मन हिंदी चित्रपटात ज्यांना आरडी बर्मन आणि ‘पंचमदा’ म्हणून ओळखले जातात. संगीत जगातील जादूगार पंचमदा यांची गणना जगातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांमध्ये केली जाते. ७० च्या दशकात त्यांची गाणी यशाची हमी बनले होते. असेही म्हटले जाते की, ते कंगव्यानेदेखील (Comb) सूर काढत असे. लता मंगेशकर यांच्याबरोबर त्यांची जोडी कमालीची होती. त्यांनी मिळून अनेक सुपरहिट गाणी दिली. ४ जानेवारी १९९४ रोजी पंचमदाने हे जग सोडले. सोमवारी लता मंगेशकर यांनी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक खुलासा केला. लता मंगेशकर यांनी ट्विट केले की, ‘आज आरडी बर्मन यांची पुण्यतिथी आहे. फार कमी लोकांना ठाऊक आहे की, पंचमदाने सरोद व तबला शिकले आणि चांगले वाजवतदेखील होते. ते एक कमालीचे कलाकार होते. मी त्यांच्या स्मृतीस नम्रपणे अभिवादन करते.’ या ट्विटसह लता मंगेशकर यांनी पंचमदाबरोबरचे त्यांचे काही जुने फोटोही शेअर केले आहेत.

त्याशिवाय पंचमदा यांनी त्यांना वेगळ्या प्रकारचे गाणे गाण्याची विनंती केली होती, असे लता मंगेशकर यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले आहे. ‘दिलबर दिल से प्यारे’ हे गाणे होते. हे गाणे वर्ष १९७१ मध्ये रिलीज झालेल्या ‘कारवां’ चित्रपटाचे होते. लता मंगेशकर यांनी पंचमदासह अनेक सुपरहिट गाणी गायली. ‘बाहों में चले आओ’, ‘तेरी याद आ रही है’, ‘पन्ना की तमन्ना’, ‘बड़ा नटखटहै ये’, ‘हम दोनों दो प्रेमी’, ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘जय जय शिव शंकर’, ‘आजा पिया तोहे प्यार दूं’ आणि ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’ ही गाणी आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, आरडी बर्मन यांचा जन्म २७ जून १९३९ रोजीचा. वयाच्या फक्त नऊ वर्षांच्या वयात त्यांनी पहिले संगीत दिले, ‘ऐ मेरी टोपी पलट के’, जे त्यांच्या वडिलांनी ‘फंटूश’ चित्रपटात वापरले होते. अगदी लहान वयातच पंचमदा यांनी ‘सर जो तेरा चकराये…’ ची रचना केली, ती गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ चित्रपटात घेण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER