भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदींचा आज वाढदिवस; राज ठाकरेंनी दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा

गानसम्राज्ञी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे. लतादीदींनी असंख्य गाणी गायली आहेत. कित्येक वर्षांपासून त्यांच्या गोड आवाजामुळे रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे. भारतरत्न लतादीदींचा आज ९१ वा वाढदिवस आहे.

ही बातमी पण वाचा:- जेव्हा बालपणी घर सोडून गेली होती लता तेव्हाच मिळाला सर्वात मोठा धडा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत लता दीदींना अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत लतादीदींना अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, जो आवाज दैवी आहे त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. संपूर्ण सूर काय असतो हे ज्यांचा आवाज ऐकल्यावर कळतं, आपल्या महाराष्ट्राचा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आणि ऐकलेला एकमेव आवाज, जो आवाज ऐकल्यावर तो अनादी आहे असं वाटत राहतं आणि अनंतदेखील. तो म्हणजे लतादीदींचा आवाज.

आज दीदींचा जन्मदिवस, दीदी जन्मदिवसाच्या तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा! अशा गोड शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज जगभरातून लतादीदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विटरवर आज ‘लता मंगेशकर’ ट्रेंडिंगवर आहेत. त्यांचे असंख्य फॅन्स, राजकीय व्यक्ती, मनोरंजन तसेच गायन क्षेत्रातील दिग्गज त्यांना ट्विट करून शुभेच्छा देत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER