लता मंगेशकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 7 लाख ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले आभार

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. महाराष्ट्रात सरकारनं कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी विशेष सहायता निधी निर्माण केला. यापार्श्वभूमीवर राज्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येते आहेत. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी कोविड १९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत (7-lakh-assistance-to-cm-assistance-fund) दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणू संसर्गाच्या (Corona virus infection) दुसऱ्या लाटेचा सामना समर्थपणे करतो. कोविड १९ विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे .

दरम्यान देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतरत्न लता मंगेशकर यांनी महाराष्ट्रासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button