लता मंगशेकर, सचिन तेंडुलकर आणि सायनाच्या ट्विटची चौकशी होणार

Anil Deshmukh.jpg

मुंबई :- आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचे कारण काय? त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव होता का? या सेलिब्रिटीजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केले होते. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये समानता दिसून येते. याची चौकशी करण्यात येणार आहे. असे आदेश दिल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangashekar), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सायना नेहवाल, अक्षयकुमार, अजय देवगण, विराट कोहली आदींच्या ट्विटची चौकशी करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER