अबब गेल्या वर्षात अक्षयने कमवले 356 कोटी रुपये

Akshay Kumar

कोरोनामुळे (Corona) जवळ जवळ सहा ते सात महिने बॉलिवुडचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. अनेक निर्मात्यांचे सिनेमे रखडले तर थिएटरवाल्यांचेही प्रचंड नुकसान झाले. बॉलिवुडचे (Bollywood) एकूण दीड ते दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. पडद्यामागील कलाकारांना काम नसल्याने त्यांच्या घरी अन्नधान्य पुरवण्याची आणि त्यांना आर्थिक मदत देण्याची वेळ बॉलिवुडवर आली होती. अशा स्थितीत अक्षयकुमारने मात्र या वर्षात तब्बल 356 कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच जगातील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या कलारांची जी यादी फोर्ब्सने प्रकाशित केली आहे त्यात अक्षयचा समावेश झालेला आहे.

एका मागोमाग एक सिनेमे देण्यात अक्षयकुमारचा (Akshay Kumar) हातखंडा आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर त्याने लगेचच आपल्या सिनेमाचे शूटिंग सुरु केले. लॉकडाऊनमध्येही (Lockdown) त्याने त्याचा ‘लक्ष्मी’ सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करून कमाई केली. आताही त्याच्याकडे सात-आठ सिनेमे असून ते सर्व पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यात ‘बेल बॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाउसफुल 5’ तसेच ‘सूर्यवंशी’ आणि दिवाळीत घोषणा केलेला ‘रामसेतु’ सिनेमा आहे.

फोर्ब्स मॅगझिन दरवर्षी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या जगभरातील कलाकारांची यादी जाहीर करते. या यादीत अक्षयकुमारचे नाव 52 व्या क्रमांकावर आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार अक्षयने या वर्षात 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच 356 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिकन स्टार कायली जेनर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER