गेल्या 22 दिवसांपासून चंद्रपुरातील एका मशिदीत लपले होते 11 तुर्कस्तानी मौलवी

चंद्रपूर: गेल्या 22 दिवसांपासून चंद्रपूरच्या एका मशिदी तब्बल 14 मौलवी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर पोलिसांनी मशिदीतून 11 तुर्कस्तानी तर भारतातील इतर भागातील 3 अशा एकूण 14 मौलवींना ताब्यात घेतले आहेत.

या सर्व मौलवींना ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. भारतावर एकीकडे कोरोनाचे संकट घोंगावत असताना हे मौलवी चंद्रपूरमधील मशिदीत का लपून राहिले होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र हे मौलवी चंद्रपूरमध्ये का लपले होते, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.