गावाला परत जाण्यासाठी परप्रांतीय कामगारांची लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी

Lokmanya Tilak Terminus - Maharastra Today
Lokmanya Tilak Terminus - Maharastra Today

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता परप्रांतीय मजुरांची आपापल्या गावाकडे परतण्यासाठीची धडपड आणखीनच वाढली आहे. रोजगार बंद झाल्याने अनेक मजुरांनी संचारबंदीतही गावाला जाण्यासाठी रेल्वे स्थानकं गाठली.

मुंबईच्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) स्टेशनला सतत सातव्या दिवशीही लॉकडाऊनच्या (Lockdown) भीतीने गावी जाण्यासाठी परप्रांतीय मजुरांनी प्रचंड गर्दी केली आहे. भागलपूर, पवन आणि गोदान एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी लांबच लांब रांग लावल्या आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याने प्रशासनाचीही गर्दीला आवर घालण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

अधिक गर्दी वाढू नये आणि आहे ती गर्दी कमी व्हावी यासाठी स्टेशन परिसरात पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. तसेच स्टेशनबाहेर बॅरेकेटिंग करण्यात आले असून तिकीट असलेल्यांनाच स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. अनेक मजूर विनातिकीट रेल्वे स्थानकामध्ये पोहोचल्याने त्यांना परत पाठवलं जात असून प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button