लॉकडाऊनच्या भीतीमुळे मुंबईत रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता कडक लॉकडाऊनचा (Strict Lockdown) निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. याच भीतीतून अनेक प्रवाशांनी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर (LTT) मोठी गर्दी केली. या गर्दीमुळे ऐन वीकेंड लॉकडाऊनमध्ये प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. लोकमान्य टिळक टर्मिनसवर जमलेले अनेक प्रवासी विनातिकीट गावी जाण्यासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं.

तसंच श्रमिक ट्रेन सुटणार असल्याची अफवा पसरल्यानेच ही गर्दी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, लोकल सेवा किंवा देशभरात होणारी रेल्वे वाहतूक याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकल सेवेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी अजून तरी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button