लालू प्रसाद यादव यादव यांची प्रकृती चिंताजनक

laluPrasadYadav

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले लालू यादव सध्या रांचीच्या रिम्समध्ये दाखल आहेत. गंभीर परिस्थितीमुळे त्यांची दिल्लीस्थित एम्समध्ये (AIIMS) भरती करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ८ सदस्यीय वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यात विविध विभागातील वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे. हे अहवाल पाहिल्यानंतर मेडिकल बोर्डाने लालूना दिल्ली एम्समध्ये पाठविण्याचा सल्ला दिला आहे. आज सायंकाळी पाच वाजता त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीला आणले जाणार आहे.

लालू यादव यांचे मुख्य चिकित्सक डॉ. उमेश प्रसाद यांनी सांगितले की, लालू यादव यांना आज एअर अॅम्बुलन्सने एम्स येथे पाठवले जाईल. त्यांनी सांगितले की, वैद्यकीय मंडळाने एकमताने निर्णय घेतला आहे की लालू प्रसाद यांना चांगल्या उपचारांसाठी एम्समध्ये हलवणे चांगले होईल. आज तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER