लालू प्रसाद यादव परत एकदा चर्चेत, जाणून घ्या ‘लालूंचे प्रयोग’..!

Maharashtra Today

भारतीय राजकारणातलं प्रमुख नाव ‘लालू प्रसाद यादव’. (Lalu Prasad Yadav ) गेल्या अनेक दिवसांपासून लालू प्रसाद यादव तुरुंगात होते. कथित चारा घोटाळ्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. परवा लालु यादवांना जामीन मिळाल्यानं त्यांची सुटका झाली. लालूंच्या परत येण्यामुळं बिहारचं राजकारण बदलेल का? या चर्चेला पेव फुटलंय. लालुप्रसादांची कारकिर्द जितकी वादळी होती तितकीच नाटकीय सुद्धा. लालूंनी केलेली अनेक निरनिराळी कामं बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. काही हसले तर काहींनी कौतूक केलं. याच कामांपैकी एक होतं, गुराखी विश्वविद्यालय म्हणजे गाई, गरं, शेळ्या मेंढ्या चारणाऱ्यांसाठी सुरु केलेलं विद्यापीठ

लालुंचे प्रयोग

गुराखी विद्यालय बनवण्याची संकल्पना स्वतः लालू यादवांची होती. ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाची यातून सोय झाली होती. जी मुलं गाई, गुरं, शेळ्या, मेंढ्या चरवतात, त्यांच्यासाठी विशेष शाळा उघडण्यात आल्या. ‘युनिसेफ’ या जागतिक स्तरावरील संघटनेनं सुद्धा याची दखल घेतली होती. अनेकांनी या प्रयोगाची प्रशंसा केली पण नंतर काही कालावधीत या शाळ्या बंद पडल्या.

अमेरिका आणि जपानच्या अनेक टीम्सनी या शाळ्यांना भेटी दिल्या होत्या. भारतात लालूंचे विरोधी गुराखी विद्यालयांवर हसत होती तर जगातली प्रगत राष्ट्र या विद्यालयांवर संशोधन करत होती. २३ डिसेंबर १९९१ मध्ये पहिल्यांदा ही बातमी वर्तमानपत्रात प्रदर्शित झाली. बिहारच्या मुजफ्फरपुरच्या तुर्कीमध्ये २५ एकर जमिनीवर पहिलं गुराखी विद्यालय सुरु करण्यात आलं. तत्कालीन जिल्हाधिकारी एच. सी. सिरोही यांनी अहवालात लिहलं होतं की या विद्यालयात पाच शिक्षक आणि पाच स्वयंसेवकांना तैनात करण्यात आलंय. १५ जानेवारी १९५२ ला लालू यादवांनी या शाळेच उद्घाटन केलं होतं.

डुक्कर आणि बकऱ्या चारणाऱ्यांना शिकवण्याची लालूंची इच्छा होती

लालु यादवांच बालपण मोठ्या संघर्षात गेलं. त्यांनी आयुष्यातल्या प्रत्येक संघर्षाला तोंड दिलं. त्यांच्या प्रमाणंच जगण्यासाठीचा संघर्ष करत शिकायची जिद्द ठेवणाऱ्या मुलांना शिकवण्याचं काम लालुंना करायचं होतं.

बिहारात लालूंच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात गुराखी विद्यालयं फ्लॉप झाले असले तरी ते बंद झाल्याची घोषणा कधीच झाली नाही. मजेशीर गोष्ट ही आहे की नितीश कुमारांनी सुद्धा २००५मध्ये सत्तेवर आल्यानंतर या शाळांशी संबंधी कोणताच निर्णय घेतला नाही. तत्कलानीक शिक्षा मंत्री वृषिणी पटेल म्हणाल्या होत्या की, “शाळा आरोपआप बंद झाल्या सरकारनं शाळा बंद होण्यासाठी सरकारनं कोणतीच नोटीस काढलेली नाही,”

पहिलवान विद्यापीठ बनवण्याचा लालूंचा होता मनोदय

जेव्हा गुराखी विद्यालयांची चर्चा वाढली. तेव्हा लालूंच्या मनात इच्छा होती की पहिलवानांच्या विद्यापीठाची स्थापना करावी. जिथं शिक्षण तिथंच कुस्ती हा लालुंचा विचार होता. गुराखी विद्यालयं चालवण्यासाठी जबाबदारी कृषि सिंचन, उद्योग, पशु पालन, ग्रामीण विकास आणि शिक्षण विभागावर होती. या शाळांमध्ये शिकणाऱ्या पोरांना मध्यान्ह भोजन, दोन गणवेष, पुस्तकं आणि मासिक भत्ता म्हणून ९ रुपये दिले जायचे. याशिवाय त्यांना रोज एक रुपया दिला जायचा. पहिली ते आठवी शाळेत अभ्यास करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना ही मदत देण्यात आली.

जाणकार सांगतात की मोठ्या विभागात समन्वय बैठक बसणं गरजेचं असतं. ज्यामुळं गुराखी विद्यालय टिकणं कठिण झालं असतं. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं यामुळं शाळांमधला सर्व्हे करुन रिपोर्ट तयार केला होता. या अहवालात या ७ जिल्ह्यातल्या गुराखी विद्यालयांची आवस्था पाहण्यात आली. या शाळा जुगाराचा अड्डा बनल्या होत्या. दारुचे अड्डे. अशी परिस्थीती निर्माण झाली होती. हा अहवाल नितीश कुमारांनी नंतर पुढं येऊच दिला नाही.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button