ललितची झोपही कलरफुल

Lalit Prabhakar

सेलिब्रिटी कलाकारांच्या हटके सवयी अनेक मुलाखतींच्या माध्यमातून आणि गप्पांच्या माध्यमातून चाहत्यापर्यंत पोहोचत असतात. कलाकारही स्वतःहून काही गोष्टी चाहत्यांसमोर उघड करत असतात. त्याबाबतचे अनेक किस्से ते सांगत असतात. अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) हा सध्या चर्चेत आहे तो त्याच्या कलरफुल या आगामी सिनेमाच्या निमित्ताने. जुलैमध्ये ललितचा कलरफुल हा सिनेमा पडद्यावर झळकणार आहे. यामध्ये सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही त्याची नायिका आहे. कलरफुल ललितला भटकायला आवडतं, इतकेच नव्हे तर तो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ललित जेव्हा भटकंतीला जातो तेव्हा तो खिशातून फोन काढत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा एखादे पर्यटन स्थळ बघत असता तेव्हा फोटो काढण्यात बिझी राहण्यापेक्षा त्या पर्यटन स्थळाचे सौंदर्य डोळ्यांनी अधिकाधिक साठवून घ्या. ललितची ही सवय देखील त्याच्या चाहत्यांना भलतीच इम्प्रेस करून गेली. अशाच काही ललितच्या भन्नाट सवयी आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे त्याची झोप. ललित जेव्हा-जेव्हा त्याच्या शूटिंग मध्ये त्याला दोन सीन मध्ये एक ब्रेक मिळतो त्या ब्रेकमध्ये तो ग्रीन रूम मध्ये ताणून देत असतो. ललितचे सहकारी कलाकारही त्याच्या झोपेबद्दल भरभरून बोलत असतात. त्याला पाच मिनिटाचा जरी ब्रेक मिळाला तरी त्या वेळात तो मनसोक्त डुलका काढतो. झोपाळू पणाचे अनेक किस्से त्याच्या सेटवर देखील घडलेले आहेत. पण त्याच्या आयुष्यात एक असा किस्सा घडला की ललितची झोप म्हणजे त्याचा कुटुंबीयांसाठी समस्या निर्माण करणारी आहे.

एकदा त्याचे आई बाबा काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यावेळी ललित एकटाच घरी होता. एके दिवशी त्याला शुटींग नव्हतं आणि अर्थातच त्याच्या सवयी प्रमाणे तो घरी झोपला. त्या दरम्यान त्याचा एक भाऊ त्याच्या कल्याणच्या घरी जाणार होता . जेव्हा त्याने ललित च्या बाबांना फोन केला की तो कल्याणला येतोय तेव्हा बाबांनी सांगितलं की आम्ही दोघे बाहेर गावी आलो आहोत पण ललित घरी आहे. तू बिनधास्तपणे जा. ललितचा भाऊ ललितच्या कल्याणच्या घरी आला आणि त्याने बेल वाजवली. मात्र आतून कोणीच दार उघडेना. बराच वेळ नव्हे तर बरेच तास तो त्याच्या घराच्या दाराबाहेर उभा होता. बेल वाजवून झाली, दार वाजवून झालं झालं तरीही ललितने आतून कोणताच प्रतिसाद दिला नाही मग मात्र त्याच्या भावाला काळजी वाटायला लागली. त्याने बाबांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ललिच्या पाहुणा म्हणून आलेल्या भावाने शेजाऱ्यांच्या मदतीने गॅलरीतून दरवाजा उघडला आणि आत पाहिलं तर हॉलला लागून असलेल्या दरवाजाच्या शेजारच्या सोफ्यावर ललित झोपला होता. पण गेली दोन तास त्याचा भाऊ बेल वाजवत असल्याचं त्याला ऐकू गेलं नाही इतका तो गाढ झोपी गेला होता. बर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ललित उठला तेव्हा त्याचा पहिला प्रश्न हा होता की , काय झालं ?तुम्ही सगळे का जमला आहात घरात ? म्हणजे मुख्य दार बंद असताना सगळेजण हॉलमध्ये गच्चीतून आलेत याचंही भान काहीवेळ ललितला आलं नाही. ललितला झोप इतकी येते की एकदा का तो झोपला की आठ ते दहा तास त्याचा डोळा उघडत नाही. अर्थातच ही रात्रीची झोप असते नाही तर तो दिवसाही असाच तासंनतास झोपू शकतो. या झोपेमुळे त्याला अनेक गोष्टींचा पत्ताच लागत नाही. त्याची ही सवय त्याच्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांमध्ये माहीत असल्यामुळे ललितवर फारशी कोणी कसली जबाबदारी टाकत नाही कारण ती जबाबदारी अंगावर घेऊन ललितला बिनधास्तपणे झोपून जायची सवय आहे. जुळून येती रेशीम गाठी या मालिकेतील आदित्य या भूमिकेने घराघरात पोहोचलेला.

ललितने गेल्या काही वर्षात मोजकं पण चोखंदळ काम करत आपला फॅन्स क्लब मध्ये वाढ केली आहे. हम्पी या सिनेमातील त्याची जी कबीर नावाची भूमिका आहे तसाच वैयक्तिक आयुष्यातही ललित भटकंतीचे प्रचंड वेड असलेला आहे. ठरवून कधीच ट्रिपला जायचं नसतं या मताचा असलेला ललित त्याच्या मनात येतं तेव्हा बॅग पॅक करून वाटेला लागतो. चि . व चि सौ. ., आनंदी गोपाळ या सिनेमातील त्याचा अभिनय विशेष उल्लेखनीय होता. आता लवकरच त्याचा कलरफुल हा सिनेमा येणार आहे. आणि कलरफुल सिनेमात पडद्यावर दिसणारा ललित हा कसा असेल हे पाहण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. पण प्रत्यक्ष आयुष्यात ललितची कलरफुल झोप त्याला अतिशय प्रिय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER