ललिता बाबर आणि डॉ.संदीप भोसले यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस केली ५० हजार रुपयांची मदत

cm relief fund

मुंबई : भारतीय महसुली सेवेत कार्यरत असलेले डॉ.संदीप भोसले आणि रिओ ऑलिम्पिकची फायनल गाठणारी मराठमोळी धावपटू ललिता बाबर या दाम्पत्याने आपल्या मुलाच्या म्हणजे रुद्रप्रताप ऊर्फ शंभुराजे याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० हजार रुपयांची मदत केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आभार आणि शुभाशिर्वाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुद्रप्रतापला त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभाशिर्वाद दिले आहेत तसेच भोसले-बाबर दाम्पत्याने मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, श्रीमती बाबर यांनी राज्य आणि देशाचा नावलौकिक वाढवला असून संयम, शिस्त आणि मेहनतीच्याबळावर त्यांनी स्वत:च्या आयुष्यात यश संपादन केले आहे. आज अशाच संयम, शिस्त आणि समाजासाठीच्या समर्पणाची गरज आहे… एकजुटीने आपल्याला या संकटाचा मुकाबला करायचा आहे. स्वत:बरोबर घरातील वडिलधाऱ्यांची आणि बालकांची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता, स्वयंशिस्त आणि शारीरिक अंतराचा निकष पाळायचा आणि कोरोनाला हरवायचं आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा करू इच्छिणाऱ्यांसाठी माहिती खालीलप्रमाणे आहे –

  • Chief Minister’s Relief Fund-COVID 19
  • Savings Bank Account number 39239591720
  • State Bank of India,
  • Mumbai Main Branch,
  • Fort Mumbai 400023
  • Branch Code 00300
  • IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

  • मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
  • बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
  • स्टेट बँक ऑफ इंडिया,
  • मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
  • शाखा कोड 00300
  • आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला