भारताची जी.एस. लक्ष्मी क्रिकेटमधील पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेफ्री

Lakshmi first female cricket referee

लंडन :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने भारताच्या जीएस लक्ष्मीची रेफ्रींच्या आंतरराष्ट्रीय पॕनलवर नियुक्ती केली आहे. रेफरींच्या पॕनलवर नियुक्ती होणारी ती पहिली भारतीय आहे. याच महिन्यात अॉस्ट्रेलियाची क्लेयर पोलासाक ही पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात पंचगिरी करणारी पहिली महिला ठरली होती. त्यानंतर आता जी.एस. लक्ष्मीने महिलांसाठी इतिहास रचला आहे.

आता पोलोसाकशिवाय अॉस्ट्रेलियाचीच एलोईस शेरिदान चासुध्दा आयसीसीच्या विकसनशील पंचमंडळात समावेकरण्यात आला आहे. तिच्यासह आंतरराष्ट्रीय पंच मंडळात महिला पंचांची संख्या आता आठ झाली आहे. लॉरेन अगेनबाग, किम कॉटन, शिवानी मिश्रा, स्यू रेडफर्न, मेरी वॉल्ड्रन आणि जॕकलीन विल्यम्स या विकसनशील पंच मंडळातील इतर सदस्य आहेत. कॕथी क्रॉस ही या मंडळाची पहिली सदस्य होती जी गेल्या वर्षी निवृत्त झाली.

ही बातमी पण वाचा : सेरेनाचा बहिण व्हिनसशी सामना झालाच नाही!

आयसीसीच्या पंच व रेफ्री विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक एड्रियन ग्रिफिथ यांनी लक्ष्मी व एलोईसच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. महिला अधिकाऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे पुढचे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांची प्रगती उत्साहवर्धक असून त्यांची नियुक्ती इतर महिलांना प्रेरित करेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. क्रिकेटमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत आम्ही लैगिक समानतेवर विश्वास ठेवतो असे असले तरी नियुक्ती पूर्णपणे गुणवत्तेवर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 51वर्षीय लक्ष्मी यांनी देशांतर्गत महिला राष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2008-09.मध्ये पहिल्यांदा सामनाधिकारी (रेफ्री) ची जबाबदारी पार पाडली होती. महिला क्रिकेटच्या तीन वन डे आणि तीन टी-20 सामन्यांत तिने रेफ्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

ही बातमी पण वाचा : इंग्लंडकडून 358 धावांचा यशस्वी पाठलाग

ही नियुक्ती म्हणजे आपल्यासाठी मोठाच सन्मान असून या नियुक्तीने आपल्याला प्रगतीचे नवे दरवाजे उघडले आहेत. क्रिकेटपटू आणि रेफ्री म्हणून माझ्याकडे असलेल्या दीर्घानुभवाचा मी माझी जबाबदारी निभवताना पूरेपूर उपयोग करेल अशा भावना लक्ष्मी यांनी व्यक्त केल्या आहेत. यासाठी तिने आयसी, भारतीय क्रिकेट मंडळाचे अधिकारी, आपले ज्येष्ठ सहकारी, कुटुंबिय आणि मित्रमंडळींना धन्यवाद दिले आहेत.

शेरिदान ही यंदाच्या सत्रात पुरुषांच्या बिग बॕश लीगमध्ये राखीव पंच होती. अॉक्टोबर 2018 मध्ये तिने पुरुषांच्या प्रिमीयर लीग अंतिम सामन्यात पंचगिरी केली होती.

ही बातमी पण वाचा : ‘यूरोप डे’ कार्यक्रमात अनिल कपूरचा होणार सत्कार