पाच कोटी घेतल्याचा आरोप करणाऱ्या शांताबाई यांच्याशी नाते-संबंध नाही – लहूदास चव्हाण

Pooja Chavan - Lahudas Chavan

बीड : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात तोंड बंद ठेवण्यासाठी या प्रकरणातील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजाचे वडील लहूदास यांना ५ कोटी रुपये दिलेत, असा आरोप शांताबाई राठोड (Shantabai Rathod) यांनी केला होता. हा आरोप लहुदास यांनी फेटाळला आहे. ते म्हणालेत, आता कोण काय बोलते हे माहीत नाही, आम्ही आमच्या दुःखात आहोत.

मंत्री संजय राठोड यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शांताबाई राठोड यांचा दावा आहे की त्या पूजाच्या चुलत आजी आहेत. याबाबत लहूदास म्हणतात की, शांताबाई या आमच्या दूरच्या नातेवाईक आहेत, मात्र आमच्यात काहीही नातेसंबंध नाहीत.

मी पोहरादेवीला जाणार होतो. राजीनाम्यानंतर संजय राठोड यांना भेटलो नाही. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली होती. पूजाच्या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मला दिले आहे, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER