लग्नापूर्वी नववधूंंनी टाळाव्यात ‘या’ गोष्टी

Marriage

आपल्या लग्नात सर्वात सुंदर दिसावे असे प्रत्येक नववधूला वाटते. मघ त्यासाठी मार्केट मधील महागडे सौंदर्यप्रसाधने घेतले जाते. नवनवीन ब्युटी ट्रीटमेंट केले जातात. पण हे करण्याआधी तुम्हाला हे माहीत असायला हवे की कधाकधी या ट्रिटमेंट्समुळे होणारे साईड इफेक्टस तुमच्या सौदर्यावर विपरित परिणाम देखील करु शकतात. जर तुमचे लग्न ठरले असेल, तर त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला खालील काही गोष्टी टाळायला हव्या..

  • सौदर्य खुलवण्यासाठी काही वेळा नववधु घरगुती नैसर्गिक उपाय करतात. जर तुम्ही यापुर्वी कधीही ते केले नसतील तर मात्र सावध रहा. कारण ते तुम्हाला सुट होतील का हे सांगता येत नाही. नवीन घरगुती उपाय वापरण्यापुर्वी प्रथम त्याची पॅच टेस्ट करुन बघा. हे उपाय सुट होत नसतील तर मात्र त्याच गोष्टी वापरा ज्या तुम्ही आतापर्यंत सौदर्यासाठी वापरत आला आहात.

  • चेह-यावर हवा तसा ग्लो व तेज येण्यासाठी नेहमी नववधु चेह-यावर केमिकल पील किंवा खास फेशियल ट्रिटमेंट करुन घ्यायला तयार होतात. पण जर तुम्ही यापुर्वी कधीही अश्या ट्रिटमेंट केल्या नसतील व ऐन लग्न जवळ आले असताना तुम्ही त्या केल्या आणि त्या ट्रिटमेंट तुम्हाला सुट झाल्या नाहीत तर तुम्हाला वाईट परिणांमांना सामोरे जावे लागु शकते. त्यापेक्षा अशावेळी तुम्ही नियमित करीत असलेले फेशियल किंवा ब्युटी ट्रिटमेंटच करा.
  • चेहरा सतत रगडल्यामुळे चेह-यावरील डेड स्कीन निघुन जातात हा एक गैरसमज आहे.काही जणींना तर चेहरा जोरात घासण्याची देखील सवय असते.यामुळे तुमच्या चेह-यामधील नैसर्गिक तेल निघुन जाते व चेहरा निस्तेज व कोरडा होतो.त्यामुळे मुरुम व पुरळ येण्याची देखील शक्यता वाढते. त्यामुळे चेहरा सतत चोळु नका.चेहरा धुताना चेह-यावर हलक्या हाताने मसाज करा. स्क्रबचा वापर आठवड्यातून दोन पेक्षा अधिक वेळा करु नका.

  • नेहमी चेहरा मॉश्चराईज करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला लग्नात सतेज दिसायचे असेल तर तुमचा चेहरा सतत मॉश्चराईज करा. मात्र यासाठी वॉटरबेस मॉश्चराईजरचाच वापर करा. जर तुम्ही ते करीत नसाल तर लगेच तसे करण्यास सुरुवात करा. चांगल्या परिणामांसाठी दिवसातुन कमीतकमी दोन वेळा तुमचा चेहरा मॉश्चराईज करणे गरजेचे आहे.
  • लग्नापुर्वी तुम्ही तुमच्या आहाराविषयी खुप जागरुक असायला हवे.कारण तुमच्या आहारात पी.एच. चे संतुलन असणे अत्यंत गरजेचे आहे. हा पी.एच.असंतुलित झाल्यास चेह-यावर सुरुकुत्या,मुरुमे येतात व त्वचा सेनसेटिव्ह होते. साखर आणि अंडयातील पिवळ्या भागासारखे अपथ्य पदार्थ पी.एच चे प्रमाण कमी करतात. ताज्या हिरव्या भाज्या व फळे पी.एच.चे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करतात. तेव्हा असाच आहार घ्या ज्यामुळे पी.एच संतुलित राहील.