कचऱ्यात सापडलेल्या बाळाला लेडी सिंघमने दिली मायेची ऊब

Madhura Korane

पुणे :कात्रज घाटात (जि. पुणे) कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज मार्निंग वॉकला आलेल्या लोकांनी ऐकून याची माहिती पोलिसांना दिली. नाईटच्या बंदोबस्ताला असणाऱ्या उपनिरीक्षक मधुरा कोराणे (Madhura Korane) यांनी हा कॉल ऐकताच दुचाकीवरून घटनास्थळ गाठले. थंडीत गारठलेल्या या बाळाला पोटाशी धरून त्याला मायेची ऊब दिली. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करून त्याचा जीव वाचविण्याची तत्परता दाखविली. त्यांच्या या कार्याचे कौतुक महाराष्ट्रभरात होत आहे.

मधुरा कोराणे या कोल्हापूरच्या सुकन्या आहेत. 2011 साली त्या पोलिस खात्यात रुजू झाल्या. सिंधुदुर्गात चार वर्षे सेवा बजावल्यानंतर कोल्हापुरात विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात कामगिरी बजावली. नुकतीच त्यांची बदली भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे झाली आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिळालेले अभृक पुरुष जातीचे असून, ते एक दिवसाचे आहे. त्याला घाटातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देऊन संबंधितांनी पोबारा केला. निव्वळ त्या बाळाचे दैव बलवत्तर म्हणूनच भटकी कुत्री, जनावरांपासून बाळ सुरक्षित वाचले. बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, कोराणे या आवर्जून त्याच्या तब्येतीची चौकशी करतात. पोलिस ठाण्याचे निरीक्षक जगन्नाथ कळसकर आणि सहकाऱ्यांच्या मदतीमुळे बाळाला वाचविणे शक्य झाल्याचे कोराणे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER