लडाख, कलम ३७० हटवल्यानंतर भाजपाने जिंकली पहिलीच निवडणूक

BJP

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर भाजपाने लडाखमध्ये झालेली पहिलीच स्थानिक निवडणूक जिंकली. लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषद (Ladakh Autonomous Hill Development Council election) च्या निवडणुकीत भाजपाला १५ आणि काँग्रेसला ९ जागा मिळाल्या आहेत. २ अपक्ष विजयी झालेत. २६ जागांवर निवडणूक झाली होती. लेह आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.

निवडणूक गुरुवारी झाली. ६५. ०७ टक्के मतदान झाले होते. ९४ मेदवार उभे होते. कोविडमुळे मतदानाच्या वेळी खास काळजी घेण्यात आली होती.

लेह आणि लडाखमध्ये आधीही भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. या भागावर आत्तापर्यंत कायम अन्याय झाला होता असे भाजपाने कलम ३७० हटवितांना म्हटले होते. आत्तापर्यंत विकासाबाबत सगळा भर फक्त जम्मू आणि काश्मीर खोऱ्यावरच दिला गेला. पर्वताळ भाग असलेल्या लेह-लडाखकडे दुर्लक्ष करण्यात आले असे भाजपाने म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER