देशात ऑक्सिजनची कमी; देवानंद गॅस प्रा. लिमिटेडसह MG मोटर्सची भागीदारी

Morris Garage - Maharastra Today
Morris Garage - Maharastra Today

नवी दिल्ली : एमजी मोटर इंडियाने मेडिकल ऑक्सिजन उत्पादन वाढविण्यासाठी देवानंदन गॅस प्रा. लिमिटेडसह भागीदारी केली आहे. सध्या देशात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हॉस्पिटल्स आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. २०११ मध्ये स्थापना करण्यात आली. देवनंदन गॅस प्रा. लिमिटेड ही बडोदा आणि अहमदाबादच्या प्रमुख मेडिकल ऑक्सिजन गॅस उत्पादनापैकी एक आहे.

एमजी मोटर इंडिया मेडिकल ऑक्सिजनच्या उत्पादनामध्ये वापरली जाणारी उपकरणे सुधारण्यास आणि उत्पादन प्रक्रियेतील तोटा कमी करण्यात मदत करेल. यासाठी अन्य क्षेत्रात सहकार्य केले जाऊ शकते. आगामी दोन आठवड्यांत उत्पादन क्षमता २५ टक्के वाढवण्यास मदत होईल. भविष्यात ५० टक्के क्षमता वाढवण्यासाठी काम करेल. एमजी मोटारीचे एमडी राजीव चाबा म्हणाले की, “आम्ही कोरोनाविरोधात लढाईसाठी पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरलो आहे. आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ग्राहकांची सुरक्षितता राखणे हे कर्तव्य आहे. ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी जे काही शक्य होईल, ते करण्याचा प्रयत्न करू. गतवर्षी हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बडोद्यातील मॅक्स व्हेंटिलेटर प्लांटमध्ये व्हेंटिलेटर उत्पादन वाढवण्यासाठी लक्ष्य केंद्रित केले होते. आता आम्ही ऑक्सिजनवर लक्ष्य करत आहोत. सद्य:स्थितीत देशाला याची जास्त गरज आहे. आम्हाला विश्वास आहे की, आपल्या सर्वांना यश येईल.”

देवनंदन गॅसेस प्रा. लिमिटेडचे मालक विजयभाई ठक्कर म्हणाले की, “या मदतीसाठी आम्ही एमजीला धन्यवाद देतो. एमजी मोटरसोबत सहकार्य करून मिळून काम करणार आहोत. आम्ही मेडिकल ऑक्सिजनची कमी करण्यास यशस्वी राहू, असा आम्हाला विश्वास आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button