सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे जनता भरडली जाते – प्रवीण दरेकरांची टीका

Pravin Darekar

मुंबई :- महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधल्या पक्षांमध्ये अंतर्गत बेबनाव व विसंवाद आहे. समन्वय नसल्यामुळे यांचा खेळ होतोय, परंतु महाराष्ट्राची जनता मात्र भरडली जाते. राज्य सरकारचा निष्काळजीपणा आणि दिरंगाईमुळे आपण आरक्षण गमावून बसलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाला बगल देण्याचं काम, दुर्दैवाने या महाविकासआघाडी सरकारकडून होताना दिसत आहे.” अशी टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मराठा आरक्षणासंबंधात (Maratha Reservation) केली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना जे आरक्षण संविधानिक पद्धतीने व आयोग नेमून दिले होते. ते उच्च न्यायालयात टिकल व सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळले नाही. त्याचे लाभ देखील सुरू झाले. परंतु आता राज्य सरकारचा ढिसाळपणा व प्रत्येक कामात दिरंगाई, वेळेवर कागदपत्र उपलब्ध करून न देणे असा निष्काळजीपणा यामध्ये आरक्षण आम्ही गमावून बसलो. असे दरेकर म्हणाले.

ही बातमी पण वाचा : लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता? प्रवीण दरेकरांचा महापालिकेला सवाल

सरकारवर तुका करताना दरेकर म्हणालेत की, मागील वर्ष- दीड वर्षापासून प्रत्येक बाबतीत महाविकासआघाडी सरकारमध्ये बेबनाव सुरू आहे. काही गोष्टी समोर येत आहेत, तर काही येत नाहीत. विजय वडेट्टीवार हे या सरकारचेच एक भाग आहेत, मंत्री आहेत आणि त्यांनी जाहीर केल्यानंतर… मग त्यांनी श्रेयवादासाठी केले का? अनलॉक करण्याची मोठ्याप्रमाणावर मागणी आहे म्हणून, लोकांच्या भावना समजून केले का? हा जरी विषय असला, तरी मुख्यमंत्र्यांनी देखील लगेच प्रतिक्रिया व्यक्त करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे समन्वय राहिलेला नाही. त्यामुळे याने केले की दुसरा करतो, दुसऱ्याने केंल की तिसरा करतो. एकंदर महाविकासआघाडी सरकारकमध्ये कामकाजामध्ये बोट्याबोळ झाल्याचे दिसते. यामध्ये जनता भरडली जात आहे. तुमचा खेळ होतो आहे एकमेकांवर कुरघोड्यांचा.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button