सातत्याचा अभाव हा राहुल गांधींच्या नेतृत्वातील दोष – शरद पवार

Sharad Pawar & Rahul Gandhi

मुंबई : सातत्याचा अभाव हा राहुल गांधींच्या नेतृत्वातील दोष आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांना देशातील नागरिक नेता मानण्यास तयार आहे का, असा प्रश्न एका मुलाखतीत पवार याना विचारण्यात आला. ते म्हणले, या संदर्भात काही प्रश्न आहेत. त्यांच्यात सातत्य दिसते नाही. राहुल गांधी कॉंग्रेससाठी अडथळा ठरत आहेत का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, कोणत्याही पक्षाचे नेतृत्व संघटनेत कसे स्वीकारले जाते यावर ते अवलंबून असते.

ओबामा यांनी केलेल्या टीकेबाबत व्यक्त केली नाराजी

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात राहुल गांधी यांच्यावर टीका करताना कॅम्ह्ट्ले आहे की, राहुल गांधी एखाद्या शिक्षकाला प्रभावित करण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यासारखे दिसतात. ज्याच्याकडे कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवण्याची योग्यता आणि उत्कटता नाही. यावर नाराजी व्यक्त करताना पवार म्हणाले, मी माझ्या देशाच्या नेतृत्वाबद्दल काहीही बोलू शकतो, परंतु, दुसर्‍या देशाच्या नेतृत्वाबद्दल बोलणार नाही. ती मर्यादा पाळायला हवी. मला वाटते की राहुल गांधींविषयी वक्तव्य करुन ओबामा यांनी ती मर्यादा ओलांडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER