अकोल्यात आपल्या मागण्यांसाठी मजुरांचा अर्धनग्न आंदोलन

Labourers agitation

अकोला : अकोला जिल्हा बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशन आणि ग्रामीण बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीनं सोमवारी शासनाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. विभागीय कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गाव पातळीवर ग्रामसेवक तर शहर पातळीवर मनपा आयुक्त यांचे प्रमाणपत्राची अट विभागीय कामगार आयुक्त कार्यालयाने ठेवली आहे. हे प्रमाणपत्र मजुरांना त्वरीत मिळावे, या मागणीसाठी सोमवारी अशोक वाटिका ते मनपा कार्यालयापर्यंत अर्धनग्न मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

विभागीय कामगार उपायुक्त कार्यालयात नियमानुसार नोंदणी आणि नुतनीकरणासाठी मजुरांना मनपा क्षेत्रात काम करतात अशा अर्थाच्या आयुक्तांच्या प्रमाणपत्राची मागणी केली जाते. मात्र अजूनही अकोला मनपाकडून मजुरांना प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळंच संतापलेल्या मजुरांनी अगळंवेगळं आंदोलन करून आपल्या मागण्या शासनापुढे लावून धरल्या.