कामगार नेते दादा सामंत यांचे निधन

labour leader Dada Samant passes away

मुंबई: कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत (९१) यांचे आज सकाळी बोरीवली ( पूर्व ) अभिनव नगर सोसायटीतील त्यांची मोठी कन्या गीता प्रभू यांच्या निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले.

प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होत. त्यांच्यामागे पत्नी प्रमोदिनी, तीन विवाहित कन्या गीता, नीता व रुता, जावई व नातवंडे असा परिवार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे तर कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांचे काका होत.

दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांच्या १६ जानेवारी १९९७ रोजी  झालेल्या निर्घृण हत्येनंतर १८ जानेवारी १९९७ ते ९ मे २०११ पर्यंत ते कामगार आघाडीचे व संलग्न युनियनचे अध्यक्ष होते. १९८१ च्या गिरणी संपानंतर त्यांनी ग्वाल्हेर येथील गिरणीमधील चांगली नोकरी सोडून ते दत्ता सामंत यांच्याबरोबर युनियनमध्ये सक्रिय झाले. कामगार कायद्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला