जयपूरच्या कामगारांसाठी श्रमिक गाडी रवाना

Shramik Train

रत्नागिरी : कोकणात विविध भागात अडकून पडलेल्या कामगारांना घरी पोहचवण्यासाठी सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी स्थानकावरुन श्रमिक स्पेशल गाडी सोडण्यात आली. यावेळी दोन्ही जिल्ह्यातील ६७३ प्रवासी कामगारांसह ही गाडी राजस्थानमधील जयपूरसाठी रवाना झाली. मडगाव स्थानकावर कामगार गाडीत बसण्याआधी त्यांची थर्मल तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे नियम पाळून कामगार प्रवाशांना गाडीत बसवण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER