कुनख – नखाचे सौंदर्य कमी करणारा रोग !

Kunakh Disease

चेहरा केस याप्रमाणेच नख सुंदर आणि छान दिसावेत अशी सर्वांची इच्छा असते. नखांचे सौंदर्य वाढविण्याकरीता अनेक गोष्टी केल्या जातात. मॅनिक्यूअर असो वा नेलआर्ट खूप मोठे सौंदर्यदालन नखांकरीता उपलब्ध आहे. परंतु जसे चेहरा वा केसांचे सौंदर्य आभ्यंतर पोषणावर, रक्त- अस्थिच्या सारतेवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे नखांचे आरोग्य चांगले राहण्याकरीता आभ्यंतर पोषण चांगले असणे आवश्यक आहे. नख हा अस्थिधातूचा मल आहे त्यामुळे अस्थिधातुचे पोषण जेवढे चांगले नख तेवढेच निरोगी दृढ असतील. रक्तसार व्यक्तिचे नख छान गुलाबी लालसर दिसतात.

नखांचे काही आजार आणि त्याचे उपाय बघूया – आयुर्वेदात (Ayurveda) कुनख, चिप्प, उपनख अशा नखांविषयीच्या आजाराचे वर्णन आढळते.

कुनख – कु – वाईट नख म्हणजेच नख काळे पडणे रुक्ष होणे खरखरीत होणे म्हणजे कुनख होय. नखांच्या मुळांतील मांसामधे विकृती निर्माण होऊन पाक होतो पूय निर्माण होतो त्यामुळे नखांच्यामूळामधे वेदना शरीरात ज्वर जाणवतो याला चिप्प उपनख असे म्हणतात. नखविकार होण्याची अनेक कारणे असू शकतात. काही औषधांचा प्रभाव, सतत पाणी सोडा साबण यांचा वापर, सतत रासायनिक संपर्क, केमिकल्सयुक्त सौंदर्यप्रसाधनाचा सतत वापर, आघात, नख खाण्याची सवय, त्वचा रोग, आमवात, संधिवात अशी अनेक कारण यात दिसून येतात.

यात मुख्यतः जात्यादी तेलासारखे औषधीसिद्ध तेल पिचू ठेवणे. लेप लावणे फायदेशीर ठरते. शिवाय व्याधीनुसार आभ्यंतर चिकित्सा औषधी योजना जलौकावचरण केल्यास नख बरा होतो

रोजच्या दिनचर्येत तेलाने मालीश करणे, नख स्वच्छ ठेवणे, वेळोवेळी कापणे या गोष्टी नखांच्या आरोग्याकरीता आवश्यक आहे. आहारात दूध तुपाचा समावेश, रुक्ष वातूळ पदार्थ न घेणे गरजेचे ठरते.

ह्या बातम्या पण वाचा : 

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER