कुमारस्वामींना व्यासपीठावर अश्रू अनावर

Kumarswami breaks down on stage

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी कर्नाटकमधील मंडया जिल्ह्यात ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचा प्रचार करताना भावुक झालेत. आपल्या कार्यकर्त्यांना मला फक्त तुमचे प्रेम हवे, असे म्हणत त्यांनी थेट रडायला सुरुवात केली.

राजकारणात कुणावर विश्वास ठेवावा अन् कुणावर नाही, अशी परिस्थिती आहे. सध्याचे राजकारण हे न समजणारे आहे, असे म्हणत कुमारस्वामींनी जनतेसमोरच अश्रूंना वाट करून दिली. माझ्या मुलाने निवडणूक लढवावी असे मला वाटत नव्हते. पण, त्याच्या समर्थकांच्या आग्रहामुळे त्याने निवडणूक लढवली; पण त्याचा येथे पराभव झाला, असे ते म्हणाले.