माजी नगरपाल कुलवंतसिंग कोहली यांच्या निधनाने ‘समाजगौरव’ व्यक्तिमत्व गमावले – राज्यपालांची श्रद्धांजली

Kulwant Singh Kohli was a Samaj Ratna- Governor

मुंबई : माजी नगरपाल व उद्योजक कुलवंतसिंग कोहली यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनामुळे मुंबई महानगरीने एक समाजगौरव व्यक्ती गमावली आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

मुंबईचे माजी नगरपाल श्री कुलवंतसिंग कोहली एक जिंदादिल व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, औद्योगिक व सांस्कृतिक जडणघडणीचे ते एक डोळस साक्षीदार होते. यशस्वी उद्योजक असलेल्या कोहली यांचा विविध सामाजिक वर्तुळांमध्ये वावर होता. शीख समुदायाच्या धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमी अग्रेसर असत. त्यांनी केलेले समाजकार्य व्यापक होते. असेही राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : कुलवंतसिंग कोहली यांचे निधन