कृती सेनन बनणार ‘गणपत’ची नायिका

kriti senon

अभिनेता टायगर श्रॉफच्या ‘गणपत पार्ट 1’ (Ganpat Part 1) सिनेमाचा टीझर गेल्या महिन्यात रिलीज करण्यात आला होता. या टीझरला फॅन्सचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. टायगरच्या या सिनेमाचे दोन भाग तयार करण्यात येणार आहेत. टीझरमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षाही प्रचंड वाढलेल्या आहेत. या सिनेमात टायगरची नायिका कोण असेल याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरु झाली होती. अनेक नायिका या भूमिकेसाठी लॉबिंग करीत होत्या. त्यातच दोन दिवसापूर्वी ‘गणपत’च्या नायिकेचा लुक एका टीझरद्वारे रिलीज करण्यात आला पण त्यात नायिकेचा चेहराच दिसत नव्हता. त्यामुळे ही नायिका कोण असेल याची उत्सुकता निर्माण झाली होती. पण आता ‘गणपत’ची नायिका दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कृती सेनन (Kriti Senan) असल्याचे समोर आले आहे, स्वतः कृतीनेच सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. बॉलिवूडमध्ये कृतीने सात वर्षांपूर्वी टायगर श्रॉफची नायिका बनूनच एंट्री केली होती.

पुन्हा एकदा टायगरसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने कृती अत्यंत आनंदी झाली असून सोशल मीडियावर तिने तिचा हा आनंद व्यक्त केला आहे. कृतीने ट्विटर वर लिहिले आहे- ‘भेटा जस्सीला. यासाठी मी खूपच उत्साहित आहे. माझ्या खास टायगर श्रॉफसोबत मी पुन्हा येत आहे. शूटिंग सुरु होण्याची मी आतुरतेने वाट पाहात आहे. चला चांगले काम करुया.’ यासोबत सिनेमाचे मोशन पोस्टर दिसत असून यात ती बाईकवर बसलेल्या एका बिनधास्त मुलीच्या रुपात दिसत आहे. यात टायगर श्रॉफचा आवाजही ऐकू येतो. तो म्हणतो, माझी लव्ह स्टोरी इथून सुरु झाली.

‘गणपत’ ची निर्मिती जॅकी भगनानी, पूजा एंटरटेनमेंट आणि गुड कंपनी करीत असून विकास बहल दिग्दर्शन करीत आहे. हा सिनेमा 2022 मध्ये रिलीज़ केला जाणार आहे. सिनेमाबाबत बोलताना कृतीने सांगितले, गेल्या काही काळापासून मी अॅक्शन जॉनर सिनेमात काम करण्यावर विचार करीत होते. ‘गणपत’ मध्ये जॅकी भगनानी आणि विकास बहल यांनी मला ही संधी दिली त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे. सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरु केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER