ही भूमिका साकार करणे प्रचंड दबावाचे आहे असे कृती सेनन का म्हणते

Maharashtra Today

अजय देवगणसोबत (Ajay Devgan) ‘तान्हाजी’ सिनेमा केल्यानंतर प्रख्यात दिग्दर्शक ओम राउत ने ‘आदिपुरुष’ (Adipurursh) सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा रामायणावर आधारित असून यात साऊथचा बाहुबली स्टार प्रभास (Prabhaas) यात रामाची भूमिका साकारीत असून सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाची भूमिका साकारीत आहे. या सिनेमाची घोषणेपासूनच चर्चा सुरु झाली असून मुंबईत याचे शूटिंगही सुरु झाले आणि पहिले शेड्यूल पूर्णही करण्यात आले. आता दुसरे शेड्यूल लवकरच सुरु केले जाणार असून सैफ अलीही यात भाग घेणार आहे. सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरु होता. काही नावांवर चर्चा सुरु होते. याच दरम्यान कृती सेननला (Kriti Sanon) सीतेच्या भूमिकेसाठी साईन केल्याचेही म्हटले जात होते. पण त्याची अधिकृत घोषणा मात्र करण्यात न आल्याने सीतेची भूमिका कोण करणार यावर सस्पेंस कायम होता. पण आता हा सस्पेंस कृती सेनने स्वतःच दूर केला आहे. ‘आदिपुरुष’मध्ये सीतेची भूमिका साकारणार असल्याचे कृती सेननने सांगितले.

कृती सेननने ‘आदिपुरुष’बाबत सांगितले, हो मी आदिपुरुषमध्ये सीतेची भूमिका साकारीत आहे. सीता हे एक महनीय आणि वंदनीय व्यक्तिमत्व असून याच्याशी अनेकांच्या धार्मिक भावना जोडल्या गेलेल्या आहेत. सीतामाईची भूमिका साकारणे सोपे नाही. मी स्वतःला खूप नशीबवान मानते की, सीतामाईच्या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. ही भूमिका साकारणे सोपे नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे. ही भूमिका साकारताना माझ्यावर खूप दबाव आहे, लोकांच्या धार्मिक भावना यासोबत जोडलेल्या असल्याने ही भूमिका योग्यरित्या साकारावी लागणार आहे. ही भूमिका साकारताना मला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हा सिनेमा मूळ तामिळ भाषेत तयार होत असून यात व्हिज्युअल इफेक्ट्सही मोठ्या प्रमाणावर आहेत. तेलुगूसोबतच हा सिनेमा हिंदी, मल्याळम आणि कन्नडमध्येही रिलीज केला जाणार असल्याचेही कृतीने सांगितले.

आशुतोष गोवारीकरने (Ashutosh Gowarikar) कृतीच्या अभिनयावर विश्वास ठेऊन तिला त्याच्या बहुचर्चित आणि भव्य ‘पानीपत’ सिनेमात ऐतिहासिक भूमिका साकारण्याची संधी दिली होती. तिचा या सिनेमातील अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. आता पुन्हा एकदा कृती पौराणिक सिनेमात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कृती लवकरच आदिपुरुषच्या शूटिंगमध्ये भाग घेणार आहे. तिच्या सीतेच्या रुपातील फोटो मात्र इतक्या लवकर रिलीज केले जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER