ऋतिक रोशनच्या क्रिश 4 मध्ये दिसणार ही नायिका

Kriti Sanon and Hrithik Roshan

ऋतिक रोशनने (Hrithik Roshan) दिलेल्या सुपरहिट सुपर 30 नंतर ऋतिकने क्रिश 4 बाबत सोशल मीडियावर बातम्या देण्यास सुरुवात केली. कोई मिल गयामध्ये सर्वप्रथम ऋतिक रोशनने सुपरहीरोची भूमिका साकारली. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर क्रिशचे आणखी दोन भाग आले. हे दोन्ही भाग प्रचंड यशस्वी झाले. त्यानंतर बरीच वर्ष क्रिशबाबत एकही बातमी येत नव्हती. राकेश रोशन यांनीही क्रिश 4 (Krrish 4) तयार करायचा आहे पण आम्ही काम सुरु केलेले नाही असे सांगितले होते.

गेल्या वर्षी क्रिश 4 ची स्क्रिप्ट फायनल केल्याची बातमी आली होती. मात्र ऋतिकने अजून स्क्रिप्ट फायनल झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्क्रिप्ट आता फायनल झाली असून पुढील वर्षी शूटिंग सुरु होण्याची शक्यता आहे. चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी कॅटरीना कैफ आणि दीपिका पदुकोणचे नाव आघाडीवर होते. या दोघींपैकी एकीची निवड केली जाईल असे वाटत होते. मात्र कृति सेननने (Kriti Sanon) बाजी मारली असून क्रिश 4 मध्ये नायिकेची भूमिका साकारण्यासाठी तिची निवड केल्याचे सांगितले जात आहे. नायिका फिजिकली फिट हवी आणि कृती सेनन व्यायाम करून आपले शरीर फिट ठेवत असल्यानेच तिची निवड केली आहे. ऋतिक आणि कृतीची जोडी पडद्यावर चांगलीच दिसेल यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER