
बॉलिवुडमध्ये एक कलाकार कोरोना मुक्त (Corona free)होतो न होत तोच दुसऱ्या कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येते. काही दिवसांपूर्वी नीतू कपूर, वरुण धवन यांना चंदीगढमध्ये सिनेमाचे शूटिंग करीत असताना कोरोनाची लागण झाली होती. आता ते कोरोनामुक्त होऊन पुन्हा शूटिंग करू लागले आहेत. ते बरे झाले आणि आता कृती सेननला (Kriti Sanon)कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कृती सेननही चंदीगढहून शूटिंग करून मुंबईला परतली होती. स्वतः कृतीनेच सोशल मीडियावर कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. आणि आता कोरोनामुक्त झाल्याची माहितीही तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
कृती सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कोरोनामुक्त झाल्याची माहिती देतानाच मनपा अधिकाऱ्यांचे आभारही मानले आहेत. कृतीने लिहिले आहे, ‘तुम्हा सगळ्यांना एक बातमी देताना मला खूप आनंद होत आहे. अखेर माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. यासाठी मी मनपा अधिकारी, सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे आणि माझ्या डॉक्टरांची खूप खूप आभारी आहे. तसेच तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि सदिच्छांसाठी तुमच्या सगळ्यांचेही खूप खूप आभार असेही कृतीने पोस्टमध्ये म्हटले आहे.
कृती चंदीगढमध्ये दिनेश विजन निर्मित आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या तिच्या नव्या सिनेमेचा शूटिंग करीत होती. या सिनेमात ति्च्यासोबत पंकज त्रिपाठीही महत्वाची भूमिका साकारीत आहे. शूटिंगच्या दरम्यानच कृतीला कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने कृतीने स्वतःला आयसोलेट करून घेतले होते. त्यानंतर काल पुन्हा एकदा कृतीने कोरोना टेस्ट केली ती निगेटिव्ह आली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला