बुलेट चालवतानाचा कृतीचा व्हीडियो झाला व्हायरल

Kriti Sanon

बॉलिवुडमधील (Bollywood) कलाकार सोशल मीडियावर जास्तच सक्रिय असतात. जरा काही झाले की लगेचच सोशल मीडियावर त्याची माहिती देतात. गेल्या काही दिवसात अनेक नायिकांनी त्यांचे पुल आणि समुद्रातील बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर टाकून फॅन्सना ट्रीट दिली होती. कृती सेननने (Kriti Sanon) मात्र अन्य नायिकांप्रमाणे बिकिनीतील फोटो न टाकता बुलेट चालवतानाचा व्हिडियो टाकला आहे. कृतीचा हा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला असून फॅन्सनी या व्हिडियोला लाईक करीत कमेंट्सही केल्या आहेत.

गेल्या महिन्यात कृती चंदीगढमध्ये राजकुमार रावसोबत तिच्या नव्या सिनेमाचे शूटिंग करीत होती. तेव्हा तिला कोरोनाची लागण झाली आणि ती मुंबईला परतली होती. कृतीने नुकतीच कोरोनावर (Corona) मात केली आहे. कृती सेननने अक्षयकुमारचा बच्चन पांडे साईन केला आहे. या सिनेमाचे शूटिंग आजपासून राजस्थानमध्ये सुरु होत आहे. सर्व टीम अगोदरच राजस्थानला पोहोचली असून अक्षयकुमार आज सेटवर उपस्थित राहाणार आहे. कृतीने या शूटिंगच्या दरम्यान मधल्या वेळेत तिने बुलेट चालवली आणि तो व्हीडियो सोशल मीडियावर टाकला. या व्हीडियोत कृती सेनन बिनधास्तपणे बुलेट चालवताना दिसत असून तिने हेल्मेटही घातलेले आहे. या व्हीडियोसोबत कृतीने कॅप्शन देताना लिहिले आहे, ‘चार चाके, शरीराला फिरवतात तर दोन चाकं आत्म्याला.’ या व्हीडियोमध्ये बॅकग्राऊंडला लकी अलीचे ‘हैरत’ हे गाणे ऐकायला येत आहे. कृतीने व्हीडियोत म्हटले आहे, या गाण्यासोबत बाईक चालवण्याचे माझे अनेक दिवसांपासूनचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले आहे. कृतीचा हा बाईकवाला व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला असून तिच्या एका प्रशंसकाने कृती रॉक्स अशी प्रतिक्रिया दिली आहे तर अनेकांनी इमोजी शेअर केल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER