कृती खरबंदाला मलेरियाची लागण

Kriti Kharbanda

ओळखले का या अभिनेत्रीला. नाही ही अत्यंत जुनी नायिका नाही तर काही वर्षांपूर्वीच बॉलिवूडमध्ये (Bollywood) आलेली नायिका आहे. मात्र एका आजाराने तिची ही अवस्था केली आहे. स्वतः तिनेच सोशल मीडियावर आपला हा फोटो टाकून, मी लवकरच यातून बरी होईन असे तिने म्हटले आहे. ही नायिका आहे कृती खरबंदा (Kriti Kharbanda). आता पाहूया तिला काय झाले आहे ते?

एकीकडे जगभरात कोरोनाची (Corona) लाट असतानाच मलेरिया, डेंग्यूने अनेक जण आजारी पडताना दिसत आहेत. यातही ताप येत असल्याने ती कोरोनाची लक्षणे तर नाहीत ना अशी शंकाही मनात उत्पन्न होते. परंतु रक्ताची तपासणी केल्यानंतर याचा उलगडा होता. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता काही कलाकारांना दुसऱ्या आजारांनीही ग्रासल्याचे दिसत आहे. कृती खरबंदाने तिला मलेरिया झाल्याचे सांगितले आहे. आपला फोटो शेअर करीत कृतीने म्हटले आहे, ‘हॅलो, हा माझा मलेरियावाला चेहरा आहे. हा आजार जास्त दिवस टिकणार नाही. मी लवकरच बरी होईन कारण मला कामावर परतायचे आहे.’

कृती खरबंदाने 2009 मध्ये तामिळ चित्रपट ‘बोनी’मधून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. त्यानंतर इमरान हाशमीच्या ‘राज: रीबूट’ मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. बिजॉय नांबियारच्या ‘तैश’मध्येही कृती दिसली होती. यात तिच्यासोबत पुलकित सम्राट, हर्षवर्धन राणे आणि संजीदा शेख होते. कृती आणि पुलकित एकमेकांना डेट करीत आहेत.

आजारपणाबाबत कृतीने पुढे म्हटले आहे की, माझ्या प्रकृतीबाबत अनेक जण चिंता व्यक्त करीत आहेत. माझे फॅनही काळजीत आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छिते की, माझ्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे आणि उद्या परवा माझी तब्येत आणखी सुधारेल. 2020 या वर्षाने मला धीर ठेवण्यास आणि स्वतःवर प्रेम करण्यास शिकवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER