शाहरुख खान प्रीती झिंटाच्या टीममध्ये, कृष्णप्पा गौतमला सव्वानऊ कोटी

आयपीएलमध्ये (IPL auction 2021) कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gautam) हा सर्वाधिक किंमत मिळवणारा भारतीय आणि सर्वाधिक किंमत मिळवणारा अनकॕपड् खेळाडू ठरला आहे. त्याने आपली बेसप्राईस फक्त 20 लाख ठेवली होती पण त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने चक्क 9.25 कोटींची विजयी बोली लावली. यासह त्याने 2018 मध्ये कृणाल पांड्याला मिळालेल्या 8.80 कोटींचा विक्रम मागे टाकला.

दुसरी लक्षणीय बाब म्हणजे शाहरुख खान हा प्रीटी झिंटाच्या पंजाब किंग्ज संघात आला आहे. त्यामुळे ही ‘दिल से’ जोडी एकत्र आल्याची चर्चा आहे.मात्र हा शाहरुख खान तामिळनाडूचा तडाखेबंद फलंदाज असून त्याने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा गाजवली आहे. त्याला 20 लाखांची बेसप्राईस असताना पंजाब किंग्जने 5 कोटी 25 लाखांची किंमत दिली.

मुश्ताक अली स्पर्धेच्या कामगिरीने शाहरूख खानची लाॕटरी लागली असली तरी याच स्पर्धेत बडोद्याच्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवणारा कर्णधार केदार देवधर हा मात्र ‘अनसोल्ड’ राहिला.

मोहम्मद अझहरुद्दीनसुध्दा आयपीएल2021 मध्ये खेळणार आहे. माजी दिग्गज कसोटीपटूच्याच नावावर नाव असलेल्या या ज्युनीयर खेळाडूला बंगलोरने 20 लाखांच्या बेस प्राईसवर आपल्या संघात,घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER