कृष्णा श्रॉफच्या जीवनात आला नवा बॉयफ्रेंड

Nusret Gökçe - Krishna Shroff

प्रख्यात ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफची (Jackie Shroff) मुलगी आणि टायगर श्रॉफची (Tiger Shroff) बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती स्वतःचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. यात अगदी स्वीमिंग कॉस्ट्यूमपासून बॉयफ्रेंडसोबतचे फोटोही ती टाकत असते. एक-दीड महिन्यांपूर्वीच कृष्णाने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. आणि तिच्या बॉयफ्रेंडला आणि तिला एकत्र टॅग करू नये असेही म्हटले होते. मात्र आता लगेचच तिने नवा बॉय़फ्रेंड शोधल्याचे दिसत आहे. कृष्णाने सोशल मीडियावर एक फोटो टाकला असून ती यात एका तरुणाच्या गालावर किस करताना दिसत आहे. यावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने चांगलीच टीका केली आहे.

कृष्‍णा श्रॉफ (Krishna Shroff) गेल्या एक-दीड वर्षापासून एबन हायम्‍स (Eban Hyams) या परदेशी तरुणाबरोबर डेटिंग करीत होती. या दोघांचे अनेक फोटो कृष्णाने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याच्या संगतीत कृष्णा अत्यंत आनंदीही असल्याचे फोटोत दिसत असे. मात्र अचानक गेल्या महिन्यात कृष्णाने एबनसोबतचे तिचे रिलेशनशिप अधिकृतरित्या संपुष्टात आल्याचे सांगितले. कृष्णाने इंस्‍टाग्रामवर याची माहिती दिली होती. परंतु या गोष्टीला महिना होत नाही तोच आता कृष्णा नव्या बॉयफ्रेंडबरोबर दिसत आहे.

कृष्णाने सोशल मीडियावर टाकलेल्या नव्या फोटोतील तरूण नसरेत गोक्से (Nusret Gokce) असल्याचे सांगितले जात असून तो टर्किश शेफ असून त्याचे स्वतःचे रेस्टॉरन्ट आहे. फोटोत कृष्‍णा त्याच्या गालावर किस करताना दिसत आहे. यावर कृष्णाच्या प्रशंसकांनी प्रतिक्रिया दिल्या असतानाच तिच्या एक्स बॉयफ्रेंडने म्हणजेच एबनने ‘तू लवकरच पुढे गेलीस’ असे म्हणते पुढे हसतानाचा इमोजी टाकला आहे. नसरेतने टायगर श्रॉफसोबतही एक फोटो शेअर केला असून त्याने या फोटोत टायगरचा उल्लेख भाई असा केलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER