मुंबईमध्ये भाजपला मोठा झटका, कृष्णा हेगडे यांना मुख्यमंत्र्यांनी शिवबंधनात अडकवले

मुंबई : मुंबईमध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. कृष्णा हेगडे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेते प्रवेश केला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मावर कारवाईची मागणी केली होती. रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचं हेगडे यांनी सांगितल्यानंतर ते चर्चेत आले होते.

कृष्णा हेगडे हे मुळचे काँग्रेसचे नेते होते. त्यांनी मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूकही जिंकली होती. सध्या हा मतदारसंघ भाजपकडे आहे. पराग अळवणी हे या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे विलेपार्ले येथे कृष्णा हेगडे यांना वाव मिळत नव्हता आणि ते गेल्या काही काळापासून अस्वस्थ असल्याचंही सांगितलं जात होतं. त्यामुळे ते भाजपला राम राम ठोकतील अशी शक्यताही वर्तवली जात होती. शुक्रवारी अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेत प्रवेश करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधलं आहे.

दरम्यान, कृष्णा हेगडे हे मूळचे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताना हेगडे यांनी तत्कालिन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर गंभीर आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. निरुपम हे निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER