स्वतःचा हात छाटूनही वयाच्या ८० व्या वर्षी इंग्रजांचा आठवेळा पराभव करणारा क्रांतीवीर कुंवर सिंह

Krantivir Kunwar Singh, who defeated the British eight times at the age of 80, despite cutting off his own hand-maharashtra Today

भारतीय स्वातंत्र युद्धात अनेकांनी पराक्रमाची शर्थ केली. इंग्रजांना भारत भूमीवरुन हद्दपार करण्याासाठी त्यांनी जीवाच रान केलं. अनेकांनी केलेल्या बलिदानाच्या कथा आजही आपल्या स्मरणात आहेत. स्वातंत्र्याच्या या यज्ञात त्यांनी सर्वस्वाची आहुती दिली होती.

या क्रांतीकारांपैकी अनेक अशी नावं आहेत जी कधी प्रकाशझोतात आलेली नाहीत पण त्यांच्या प्रेरणेच्या प्रकाशानं पारतंत्र्याचा अंधकार दूर झाला. मग ते ओडीसाचे बाजी राऊत असोत ज्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची अहूती दिली. किंवा वीर कुंवर सिंह (Krantivir Kunwar Singh) ज्यांनी वयाच्या ८०व्या वर्षी इंग्रजांविरुद्ध फक्त युद्धाचं बिगूलच पुकारलं नाही तर पराभवही केला.

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात १७७७मध्ये वीर कुंवर यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना खेळांऐवजी घोडेस्वारी, तिरंदाजी, तलवारबाजी इत्याची शिकण्यात रस होता. त्यांनी मार्शल आर्टच शिक्षण घेतलं. शिवछत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी गनिमी काव्याचा वापर केला होता. याच युद्धनितीच्या बळावर त्यांनी इंग्रजांचा वारंवार पराभव केला.

भारताच पहिलं स्वातंत्र युद्ध म्हणून ज्या १८५७च्या उठावाची इतिहासात नोंद आहे. त्या युद्धावेळी वीर कुंवर यांच वय होतं ८० वर्ष. या वयात इतरांना शांतीत वेळ व्यतीत करायचा असतो. आराम हवा असतो पण वीर कुंवर यांना देशप्रेम स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांनी सैनिक बांधवांची साथ देण्यासाठी रणभूमित उतरण्याचा निर्णय घेतला.

इंग्रजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी त्यांनी सर्व सामर्थ्य एकवटलं. साथीदारांना गोळा केलं. रणनिती आखली आणि इंग्रजांचं अधिपत्य असलेलं आरा नगर जिंकून घेतलं.

इंग्रज सेना शांत बसणार नव्हती. काही दिवस त्यांनी मौन बाळगलं. हलचाली केल्या नाहीत. वातावरण शांत झाल्यानंतर अचानक दुप्पट ताकदीनं वीर कुंवरवर हल्ला केला. या हल्ल्यामुळं वीर कुंवर यांना घर सोडावं लागलं. पण त्यानी या संकटाला संधीच्या रुपात पाहिलं. स्वातंत्र्याच्या या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी त्यांनी मिर्झापूर, बनारस, आयोध्या, लखनऊ, फैजाबाद, रीवा, बांदा, कलापी, गाजीपूर, बांसडीह, सिंकदरपूर, मनियर आणि बलिया समेत अन्य ठिकाणांचा दौरा केला. नव्या साथीदारांना जोडलं. इंग्रजांचा पराभव करण्याच्या प्रेरणेनं सर्वांना एकत्रित केलं.

वीर कुंवर यांनी ज्या ज्या भागात संघटन करायला सुरुवात केली त्या त्या भागात विद्रोह वाढीस लागला. इंग्रजी सैन्यासाठी वीर कुंवर मोठा अडथळा बनले होते. त्यांचा काटा काढणं इंग्रजांसाठी प्रथम प्राधान्य बनलं होतं. इंग्रजांनी शक्ती वाढवली आणि वीर कुंवर यांच्या साथीदारांना लाच देवून कुंवर स्वतःच्या गोटात सामील करायला सुरुवात केली.

वीर कुंवर यांचा बंदोबस्त करणं त्यांच्यासाठी सोप्प नव्हतं. त्यांच्या अनोख्या युद्ध तंत्रामुळं त्यांनी इंग्रजांना सात वेळा रणभूमित खडे चारले होते.

भोजपूरमध्ये इंग्रजांचा पराभव केल्यानंतर वीर कुंवर यांनी कानपूरकडे मोर्चा वळवला. कानपूरला तात्या टोपे आणि नानासाहेब पेशव्यांना साथ दिली. या यु्द्धात कुंवर यांच्या पराक्रमानं सर्वच प्रभावित झाले. कानपूरनंतर त्यांनी आजमगडमध्ये इंग्रजांना खडे चारले. प्रत्येक वेळा इंग्रजांचा पराभव व्हायचा पण इंग्रज पुन्हा त्या प्रदेशावर हल्ला करुन तो भाग जिंकून घ्यायचे. पण आता वीर कुंवर यांची दहशत त्यांच्या मनात बसायला सुरुवात झाली होती. इंग्रज अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थीतीत त्यांचा बंदोबस्त लावायचा होता.

प्रत्येक युद्धात वीर कुंवर नवी रणनिती आखायचे. एकदा युद्धात वीर कुंवर यांनी माघार घेतली. इंग्रजांना वाटलं त्यांनी पळ काढला. सैनिक विजयोत्सव साजरा करत होते. तेव्हा कुंवर यांनी परत फिरून आक्रमण केलं आणि इंग्रजांचा पराभव केला. इंग्रजांना सावरण्याची संधी मिळाली नाही. इंग्रजांच्या मनात त्यांची दहशत निर्माण झाली होती.

आजमगडच्या युद्धानंतर २० एप्रिल १८५८च्या गाजीपूरच्या मन्नोहर गावात पोहचले. तिथून पुढं ते २२ एप्रिलला नदी मार्गानं जगदिशपूरच्या दिशेनं रवाना झाले. या प्रवासात त्यांच्या सोबत काही साथीदार होते. ही खबर काही गद्दारांनी इंग्रजांच्या कानावर घातली.

इंग्रजांनी संधीचा फायदा उचलत रात्रीच्या अंधारात कुंवर सिंहांच्या तुकडीवर हल्ला चढवला. तुलनेत कमी साथीदार असतानासुद्धा त्यांनी निखरानं लढा दिला. युद्धाच्या धांदलीत त्यांची तलवार थांबत नव्हती. इंग्रज गोळ्यांची बरसात त्यांच्यावर करत होते. अशातच एक गोळी त्यांच्या हाताला लागली. तरीही ते लढत राहीले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER