कोयना धरण 80 टक्के भरले

Koyna Dam

सातारा :- कोयना धरणाच्या (Koyba Dam) पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसात सलगतेने जास्त पाऊस झालेला आहे. सद्यस्थितीतही पाणलोट क्षेत्रात पर्जन्सवृष्टी सुरु आहे. आज सकाळी 8 वाजता कोयना जलाशय पाणी पातळी २१४१ फुट ०८ इंच आहे. सध्या जलाशयमध्ये ८०.४५ टी.एम.सी. एवढा एकूण पाणीसाठा झालेला आहे, अशी माहिती कोयनानगर कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.

सद्या सुरु असलेले पर्जन्यमान असेच चालू राहिले तर जलाशय परिचालन सुची नुसार निर्धारीत जलपातळी राखण्यासाठी 14 ऑगस्ट पासून सकाळी ११.०० वाजल्यापासून पायथा विदयुतगृहातून सुमारे २१०० क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. यानंतर पुढील गरजेनुसार सांडव्यावरुनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाडया, वस्त्यामध्ये राहणा-या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये. वीज, मोटारी , इंजिने शेती अवजारे तसेच तत्सम साहित्य पशुधन यांचेही सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन सिंचन विभागाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER